AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis: शरद पवार खरंच राजकारणातून निवृत्त होणार? देवेंद्र फडणवीस यांची थेट प्रतिक्रिया

Devendra Fadnavis reaction on Sharad Pawar retirement: शरद पवार हे खरंच राजकारणातून निवृत्त होणार आहेत का? 12 डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यापूर्वी चर्चांना उधाण आलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis: शरद पवार खरंच राजकारणातून निवृत्त होणार? देवेंद्र फडणवीस यांची थेट प्रतिक्रिया
शरद पवार खरंच राजकारणातून निवृत्त होणार? देवेंद्र फडणवीस यांची थेट प्रतिक्रिया
| Updated on: Nov 24, 2026 | 1:17 PM
Share

Devendra Fadnavis reaction on Sharad Pawar retirement: ज्येष्ठ नेते शरद पवार हे खरंच राजकारणातून आणि समाजकारणातून निवृत्त होत आहेत का? 12 डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यादिवशी याविषयीची घोषणा होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावरून राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये थेट प्रतिक्रिया दिली. आंतरराष्ट्रीय ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन महोत्सवाच्या निमित्ताने ते कामठीमध्ये आले होते. त्यावेळी काय म्हणाले फडणवीस?

फडणवीस यांची थेट प्रतिक्रिया

“एक गोष्ट मी सांगतो, शरद पवार यांना उत्तम आरोग्य लाभावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि पवार साहेब हे आजही सक्रिय आहेत. मी जवळून त्यांना बघितलं आहे. ते सातत्यानं वेगवेगळ्या प्रकल्पात, कामात रूची घेत असतात. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीची चर्चा करणे योग्य होणार नाही. आपल्या आयुष्यात ते कधीही थांबणार नाहीत. आपल्या आयुष्यात ते नेहमी काही ना काही सकारात्मक करत राहतील. मला असा वाटतं की या ज्या चर्चा आहेत, त्या करण्याचं काहीएक कारण नाही.”

कोयनेचं पाणी वळवणार?

सध्या राज्यावर दुष्काळाचं गडद सावट आहे. अशावेळी कोयनेचं पाणी मुंबईकडं वळवणार यावर महायुतीमधील काही नेत्यांची विरोधी भूमिका समोर आली आहे. त्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. पहिली गोष्ट अशी आहे की कुठलाही अभ्यास न करता अनेक लोक या विषयावर बोलत आहेत. एकतर आताचं कोयनेचे पाणी वळवण्याचा विषयच नाही. कोयनेचं जवळपास 60 टीएमसी पाणी वीज तयार केल्यानंतर सोडून देतो. ते पाणी कुणाच्याच उपयोगात येत नाही. ते पाणी समुद्रात जातं. खाली जातं. ते कुणाच्याच उपयोगात येत नाही. ते पाणी वर उचलावं लागेल. ते सोप काम नाही. त्यावर अभ्यास सुरू आहे. तर याच्यामध्ये हे पाणी जर मुंबईकडे आणता आलं तर अनेक प्रकल्पावर जो मुंबईचा ताण आहे, तो आपल्याला कमी करता येईल. मुंबईला ही पाणी पुरवठा होईल. अर्थात कोकणातील नेत्यांच्या मागणीचाही विचार करावा लागेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

पाणी उचलून आणणार नाहीत. जेव्हापासून कोयना प्रकल्प झाला, तेव्हापासून हे पाणी वाहून जात आहे. त्याचा थेंबाचाही विचार झाला नाही. पण आपण विचार सुरू केल्यावर त्यावर वाद घालण्यात येत आहे. ज्या भागात पाणी नाही, त्या भागात पाणी न्यायचे आहे. सातारा, सांगली, सोलापूरमधील दुष्काळी भागाला पाणी देणार आहोत. जे पाणी वाया जाणार आहे, ते दुष्काळी भागाला देऊ. अजून अभ्यास पूर्ण व्हायचा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बातमी अपडेट होत आहे…

Follow Us
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; फडणवीसांची उपस्थिती
ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 27 वा वर्धापन दिन उत्साहात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती!
रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक....
Pratap Sarnaik : रिक्षाचालकांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक, 26 तारखेला बैठक; प्रताप सरनाईकांचं बंद मागे घेण्याचं आवाहन
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर.
गोकुळ सुनावणीसाठी कोट्यवधींची उधळपट्टी? नवनाथ बान यांचा सतेज पाटलांवर निशाणा!
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चा...
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे सुप्रिया सुळे नाराज?
एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर..
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर...
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची..
Rohit Pawar Tractor Morcha : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची मात्र वेगळी भूमिका
50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा ने
Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?
शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
Shinde Sena Meeting : शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; संतोष पवारांचा व्हिडिओ....
Sandip Deshpande : Shinde Sena : 50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; शाखाप्रमुख संतोष पवारांचा व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून व्हायरल