
शिल्पा शेट्टी- योगासनं हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे, असं बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मानते. तिचे स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे, जिथे ती केवळ योगासनांचा सरावच करत नाही तर ती योगासनं शिकवते देखील. वयाच्या 50 व्या वर्षीही शिल्पा पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि ही योगासनांचीच कमाल आहे.

दीपिका पडूकोण - बॉलीवुडची नामवंत अभिनेत्री असलेली दीपिका पडूकोण ही तिचा अभिनय, सौंदर्य या प्रमाणेच फिटनेससाठीही नावाजली जाते. फिटनेसच्या बाबतीत ती भल्याभल्यांना मागे टाकते. दीपिका तिचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अनेक योगासनं करत असते. तिला योगासनं खूप आवडतात.

मलायका अरोरा - 51 वर्षांची असूनही मलायका अरोरा आजही अतिशय तरूण दिसते. मलायका ही फिटनेस फ्रीक असून ती नियमितपणे योग करते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही तिने बरेचदा योगासनं करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. मलायकाचा फिटनेस हा तिच्या चाहत्यांसाठी एक मोटिव्हेशन ठरत आहे.

रकुल प्रीत सिंह - बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्या चुलबुली व्यक्तिमत्त्वासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. याशिवाय तिच्या फिटनेससाठीही अनेकजण रकुलचे चाहते आहेत. रकुल अनेकदा सोशल मीडियावर योगासनांचे व्हिडिओ शेअर करते. ती योगासनांमुळे खूप प्रेरित झाली असून अनेकदा तिचा पती जॅकीसोबत योगा व्हिडिओ बनवते.

सेलिना जेटली - एकेकाळी सेलिना जेटलीची बॉलिवूडमध्ये खूप हवा होती, सध्या जरी ती लाईमलाइटपासून दूर असली तरी आजही सेलिना प्रचंड फिट आहे. ती अतिशय समतोल आयुष्य जगते.सेलिना बऱ्याचदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर योगासनांचे व्हिडीओ शेअर करत असते.