उन्हाळ्यात घामामुळे होतो मेकअप खराब ? या टिप्स फॉलो करून पहा.

| Updated on: Apr 01, 2024 | 3:38 PM

बहुतांश मुलींना मेकअप करायला आवडतं, पण उन्हाळ्यात अनेकदा घामामुळे चेहरा चिकट होतो. त्यामुळे मेकअप खराब होऊ शकतो. अशा वेळी या टिप्स लक्षात ठेवल्या तर मेकअप खराब होणार नाही आणि बराच काळ टिकेल.

1 / 5
कडक ऊन आणि वातावरणातील उष्णतेमुळे त्वचेला घाम येऊ लागतो आणि त्वचा चिकट होते. अशा वेळेस जेव्हा मुली मेकअप करून बाहेर जातात, तेव्हा घामामुळे त्यांचा मेकअप बिघडतो आणि चेहरा चिकट होऊ लागतो. अशा परिस्थितीत काही टिप्स  लक्षात ठेवल्यास फायदा होतो.

2 / 5
बर्फाचा क्यूब स्वच्छ कपड्यात गुंडाळा आणि मेकअप करण्यापूर्वी काही सेकंदांसाठी तो चेहऱ्यावर लावा. त्यामुळे चेहऱ्यावरील छिद्र बंद होण्यास मदत होऊ शकते. तसेच यामुळे त्वचा हायड्रेट होण्यासही मदत होते.

3 / 5
उन्हाळ्यात त्वचा हायड्रेटेड ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी नारळाचं पाणी किंवा कोरफडीचं जेल वापरू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत होते. तसेच चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे चेहरा चिकट दिसत नाही.

4 / 5
चेहऱ्यावर मेकअप लावण्यापूर्वी, त्वचेची तयारी करावी लागते. त्यासाठी प्रायमर लावण्यापूर्वी लाइट वेट मॉयश्चरायझर वापरावे. पण खूप तेलकट क्रीम वापरू नका. तेलकट त्वचेवर हलके मॉइश्चरायझर वापरल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करता येते.

5 / 5
उन्हाळ्यात वॉटरप्रूफ मेकअप वापरण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून मेकअप चिकट दिसत नाही आणि त्वचेवर बराच काळ टिकतो. तसेच एखादी लाइट वेट लिपस्टिक आणि शक्यतो न्यूड शेड वापरा. तसेच तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार लाइट वेट फाउंडेशन वापरा.