Yuzvendra Chahal : रिटायरमेंट प्लॅन तयार! युझवेंद्र चहलच्या इन्स्टा पोस्टमधून निवृत्तीचे संकेत? नेमकं काय लिहिलंय?

युझवेंद्र चहलच्या एका सोशल मीडिया पोस्टने क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लंडनमधील लॉर्ड्स मैदानावरील स्वतःचा फोटो शेअर करत चहलने त्याला एक आगळं वेगळं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टनंतर चहलच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं आहे.

| Updated on: Sep 24, 2026 | 5:41 PM
1 / 5
भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावरील स्वतःचा एक फोटो शेअर करत त्याला द लास्ट डान्स असे कॅप्शन दिले आहे. या गूढ पोस्टमुळे क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावरील स्वतःचा एक फोटो शेअर करत त्याला द लास्ट डान्स असे कॅप्शन दिले आहे. या गूढ पोस्टमुळे क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

2 / 5

सहसा 'लास्ट डान्स' या शब्दांचा वापर खेळाडू त्यांच्या शेवटच्या टप्प्यासाठी किंवा निवृत्तीचे संकेत देण्यासाठी करतात. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी चहल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.

3 / 5

चहल बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट २०२३ मध्ये खेळला होता. २०२४ च्या टी-२० विश्वचषकात तो संघात होता, पण संपूर्ण स्पर्धेत त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

4 / 5

ही पोस्ट केवळ निवृत्तीशी जोडणे घाईचे ठरू शकते. चहल सध्या इंग्लंडमध्ये नॉर्थहॅम्प्टनशायर संघाकडून काउंटी चॅम्पियनशिप २०२६ खेळत आहे. त्यामुळे या हंगामातील त्याच्या शेवटच्या काउंटी सामन्याच्या पार्श्वभूमीवरही त्याने ही पोस्ट केली असू शकते.

5 / 5

चहलने अद्याप आपल्या या पोस्टमागील नेमका अर्थ स्पष्ट केलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत तो स्वतः किंवा बीसीसीआय याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करत नाही, तोपर्यंत त्याच्या निवृत्तीचे वृत्त केवळ एक चर्चाच राहणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us