इस मोहतरमा के साथ जहीर होली नही खेल सकता; ट्रोल करणाऱ्याला सोनाक्षीचे सडेतोड उत्तर

सोनाक्षी सिन्हाने एकटीने होळी साजरी केल्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. सोनाक्षीने देखील त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

| Updated on: Mar 15, 2025 | 12:59 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा काही महिन्यांपूर्वीच लग्न बंधनात अडकली आहे. ती लग्नानंतरचे सण धुमधडाक्यात साजरे करताना दिसते. नुकताच तिने होळी हा सण देखील साजरा केला आहे. पण हा सण तिने एकटीने साजरा केला असल्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. सोनाक्षीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देखील दिले आहे.

2 / 5
सोनाक्षीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर होळी खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

3 / 5
सोनाक्षीने पांढऱ्या रंगाचे ड्रेस घातला आहे. तसेच मोकळे केस, हाताला गुलाबी रंग लावून सोनाक्षी दिसत आहे.

4 / 5
सोनाक्षी एकटी होळी खेळत आहे हे पाहून नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केले आहे. एका यूजरने, 'मैं दावे के साथ कह सकता हूं कि, इस मोहतरमा के साथ जहीर होली नही खेल सकता' थेट असे म्हटले आहे.

5 / 5
सोनाक्षीने तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. 'कमेंटमध्ये थोडे शांत रहा... जहीर इकबाल मुंबईतच आहे आणि शूटवर आहे. त्यामुळे आम्ही एकत्र नाही. डोक्यावर थोडे थंड पाणी टाका' असे म्हणत सोनाक्षीने संताप व्यक्त केला आहे.