अमिताभ बच्चन यांच्यामुळे सेटवर ढसा-ढसा रडली जीनत अमान, अमिताभ यांनी मागितली माफी पण…

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यामुळे सेटवर ढसा-ढसा रडली. शेवटी माफी मागून देखील काही झालं नाही. काय होतं कारण?

| Updated on: Mar 21, 2026 | 10:14 AM
1 / 6
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जीनत अमानने तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. विशेषतः अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिने ‘लावारिस’, ‘डॉन’, ‘दोस्ताना’, ‘महान’ आणि ‘पुकार’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या जोडीला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती.

2 / 6
अमिताभ बच्चन वेळेचे अत्यंत काटेकोर पालन करणारे अभिनेता म्हणून ओळखले जातात. ते कधीही शूटिंगसाठी उशिरा पोहोचत नाहीत अशी त्यांची प्रतिमा आहे. मात्र, जीनत अमानने अलीकडेच एक असा किस्सा सांगितला, ज्यामुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

3 / 6
अमिताभ बच्चन यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना जीनत अमानने सोशल मीडियावर हा जुना अनुभव शेअर केला. तिने सांगितले की, ती एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी सकाळच्या शिफ्टमध्ये वेळेवर पोहोचली होती. मात्र, त्या दिवशी अमिताभ बच्चन थोडे उशिरा आले होते.

4 / 6
सुमारे 45 मिनिटांनी अमिताभ बच्चन थेट सेटवर पोहोचले. जीनत अमानही सेटवर गेल्या. पण त्या आधीच चित्रपटाचे दिग्दर्शक चिडलेले होते. त्यांनी कोणतीही खात्री न करता सर्वांसमोर जीनत अमानलाच उशीरासाठी जबाबदार धरले आणि तिला सुनावले.

5 / 6
या प्रकारामुळे जीनत अमान खूप दुखावल्या गेल्या आणि सेटवरच रडू लागल्या. तिने रडतच शूटिंग सोडून दिले. हा प्रसंग तिच्या आयुष्यातील एक अत्यंत वेदनादायक अनुभव ठरला.

6 / 6
यानंतर अमिताभ स्वतः त्या दिग्दर्शकाला घेऊन जीनत अमानकडे गेले आणि त्यांनी माफी मागितली. दिग्दर्शकालाही आपली चूक लक्षात आली होती. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या उशिराची जबाबदारी चुकीने जीनत अमानवर टाकली होती. जीनत अमानने नंतर तो चित्रपट पूर्ण केला, मात्र त्या दिग्दर्शकासोबत पुन्हा कधीच काम केले नाही.

Follow Us