मुंबई : अंधेरी पोट निवडणुकी आधी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना झटका देणारा निर्णय दिला आहे. निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेची ओळख ठाकरे गट अशी राहणार. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही.
निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. दोघांनाही सोमवारपर्यंत नव्या चिन्हासाठी पर्याय द्यावा लागणार आहे.
सोमवारी दोन्ही गटांना मुक्त चिन्हांमधल्या 3 चिन्हांची निवड करून ती निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागणार आहेत.
सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना आपापल्या चिन्हांची निवड करण्याची मुदत देण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश
दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही.
दोन्ही गटांपैकी कोणालाही “धनुष्य आणि बाण” हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील.
संबंधित गट, त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडनार चिन्ह निवडू शकतात.
दोन्ही गटांना ते निवडतील अशी वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील
निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल.ॉ
सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यांच्या गटांची नावे ज्याद्वारे त्यांना आयोगाने मान्यता दिली असेल आणि यासाठी, प्राधान्य क्रमाने तीन पर्याय द्या, त्यापैकी कोणीही असू शकतो
आयोगाने मंजूर केलेले आणि उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर संबंधित गट. ते मध्ये तीन मुक्त चिन्हांची नावे सूचित करू शकतात
त्यांच्या पसंतीचा क्रम, त्यापैकी कोणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केले जाऊ शकते.
शिवसेना हे पक्षाचं नावही दोन्ही गटांना सध्या वापरता येणार नाही. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक पार पडेपर्यंत निवडणूक आयोगाचे ही निर्बंध दोन्ही गटांना लागू असणार आहेत.