शिंदे सरकारशी पंगा महागात पडला; ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल

| Updated on: Oct 19, 2022 | 11:29 PM

सरकार विरोधात मोर्चा काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शिंदे सरकारशी पंगा महागात पडला; ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल
Follow us on

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते हे शिंदे-फडणवीस सरकारच्या टार्गेटवर आहेत. शिंदे सरकारशी पंगा घेणे ठाकरे गटाच्या नेत्यांना चांगलेच महागात पडले आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव,अंबादास दानवे आणि अरविंद सावंत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नवी मुंबईच्या एनआरए पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी देखील भास्कर जाधव यांच्याविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

भास्कर जाधव, अंबादास दानवे आणि अरविंद सावंता यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे सरकार विरोधात मोर्चा काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे समजते.

नवी मुंबईच्या एनआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 506,189 आणि 153 कलमा अंतर्गत भास्कर जाधव, अंबादास दानवे आणि अरविंद सावंता यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात सुषमा अंधारे,आमदार भास्कर जाधव,खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे हे नेते उपस्थित होते. यावेळी सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती. तर, विनायक राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक आणि बदनामी करणारे भाषण केले होते.

कलम 153,500 आणि 504 तसेच कलम 153 अंतर्गत दोन गटात हाणामारी करण्याच्या उद्देशाने केलेले वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर, कलम 500 ,504 अंतर्गत बदनामी केल्याचा गुन्हा या नेत्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे.