AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘दारु पिता का?’ नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान अब्दुल सत्तार यांनी असा प्रश्न कुणाला विचारला?

शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या अब्दुल सत्तार यांचा गेवराईतील व्हिडीओ व्हायरल

Video : 'दारु पिता का?' नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान अब्दुल सत्तार यांनी असा प्रश्न कुणाला विचारला?
अब्दुल सत्तार यांच्या प्रश्नाचा संदर्भ काय?Image Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Oct 28, 2022 | 10:20 AM
Share

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये स्वतः चहा घेत असताना अब्दुल सत्तार यांनी एका अधिकाऱ्याला ‘दारु पिता का?’ असा प्रश्न विचारला. कृषीमंत्र्यांचा हा व्हिडीओ (Abdul Sattar Video) समोर आल्यानंतर त्यावर काँग्रेसने निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी हा व्हिडीओ ट्वीट करुन अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावरुन सवाल उपस्थित केला आहे. हा अतिवृष्टी पाहणी दौरा की मद्यसृष्टी पाहणी दौरा? असा प्रश्न त्यांनी अब्दुल सत्तार यांना उपस्थित केला आहे.

पाहा, अब्दुल सत्तार यांचा व्हिडीओ :

21 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान नेतेमंडळी, अधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत ते एका ठिकाणी चहा घेत होते. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेला हा अजब प्रश्न आता चर्चेत आला आहे.

चहा घेण्यास नकार दिलेल्या जिल्हाधिकाऱ्याला अब्दुल सत्तार यांनी ‘दारु पिता का?’ असं प्रश्न विचारला. खोचकपणे विचारलेल्या या प्रश्नावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केलीय.

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. राज ठाकरे यांनीही पत्र लिहून तशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती.

दरम्यान, गुरुवारी आदित्य ठाकरे यांनीदेखील नाशिक आणि पुणे जिल्ह्याचा दौरा केला होता. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरकारने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, शिंदे गटातील नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर सडकून टीकाही केली होती.

Follow Us
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार