Abdul Sattar : तर शिंदे कदाचित देवेंद्र फडणीसांची अडचण करतील; अब्दुल सत्तार यांचा बोलता बोलता मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Jul 11, 2022 | 4:42 PM

Abdul Sattar : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांत नेत्यात समन्वय करण्याएवढा मी एवढा मोठा पुढारी नाही. शेवटी शिंदे जे निर्णय घेतली तो आम्हा सर्वांना मान्य राहील. त्यांचं जुळंल तर चांगलंच आहे. त्यांनी सांगितलं शिवसेना सोडून द्या तर सोडून देऊ.

Abdul Sattar : तर शिंदे कदाचित देवेंद्र फडणीसांची अडचण करतील; अब्दुल सत्तार यांचा बोलता बोलता मोठा गौप्यस्फोट
आ. अब्दुल सत्तार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबाद: एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचं राज्यात सरकार आलं आहे. नव्या सरकारमध्ये शिंदे यांना मुख्यमंत्रीपद तर फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं आहे. मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांना थेट उपमुख्यमंत्रीपदावर जावं लागल्याने त्याबाबतच्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. फडणवीस यांचीही पदावनती असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, हा आपला सन्मान असल्याचं फडणवीस वारंवार सांगत आहेत. या सर्व चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे आगामी काळात फडणवीसांनाही भारी पडतील असं सत्तार यांना म्हणायचं आहे. सत्तार यांच्या या विधानामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच ज्या दिवशी शिंदे ठरवतील त्याच दिवशी मला मंत्रिपद मिळेल असं सांगतानाच शिंदे घेऊन गेलो तर आम्ही मातोश्रीवर नक्की जाऊ, असंही त्यांनी सांगितलं.

अब्दुल सत्तार यांनी टीव्ही9 मराठीशी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही आगामी काळात अडचण करतील काय? असा सवाल करण्यात आला. त्यावर, कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांना त्रास झाला नाही तर… नाही तर या 100 जणांमध्ये दोघात भांडणं लागून जायची, असं मी बोलू नये. यांचे 150 म्हणजे 130 आमदार आहेत. त्यापैकी 50 जणांचा चार्ज शिंदेंकडे दिला अन् ही तुमची निशाणी आहे, तुम्ही आमदारांची संख्या वाढवा असं भाजपने सांगितलं तर हे 50 चे 100 करायलाही कमी पडणार नाहीत. हा माणसं जोडणारा माणूस आहे, असं सत्तार यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

शिंदे लोकप्रिय नेते ठरतील

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांत नेत्यात समन्वय करण्याएवढा मी एवढा मोठा पुढारी नाही. शेवटी शिंदे जे निर्णय घेतली तो आम्हा सर्वांना मान्य राहील. त्यांचं जुळंल तर चांगलंच आहे. त्यांनी सांगितलं शिवसेना सोडून द्या तर सोडून देऊ. त्यांनी सांगितलं राहा तर राहू. त्यांनी सांगितलं तुम्ही असं करा तर करू. त्यांनी सांगितलं तसं करा तर तसं करू. शेवटी कुणाच्या तरी विश्वासावर मतदारसंघ चालतोय. शिंदेंची ओपनिंग सुरू झाली. तुम्ही पुढे पुढे पाहा ते लोकप्रिय नेते होतील, असं ते म्हणाले.

मातोश्रीवर जायचे की नाही तेच ठरवतील

मातोश्रीवर जाण्याचा रस्ता शिंदेंना माहीत आहे. आम्ही त्यांच्या रिक्षात बसलो आहोत. 50 लोक त्यांच्या रिक्षात आहोत. त्यांचा रस्ता मातोश्रीच्या मार्गाने गेला तर वेल अँड गुड. नाही गेला तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. शेवटी नेता म्हणून कुणावर तरी विश्वास ठेवावा लागतो. त्यांनीच मला शिवसेनेत नेले. मी काही शिवसैनिक नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पक्षाची धोरणे मान्य करावीच लागतात

मी 2019ची निवडणूक एमआयएमकडून लढली नाही. शिवसेना-भाजपकडून लढली. तेव्हा ते काय मुस्लिम होते का? की मागासवर्गीय होते का? ते हिंदूच होते. ज्या पक्षात जातो त्यांची धोरणे मान्य करावीच लागेल. नाही तर पक्ष सोडावे लागतात. दोनच पर्याय असतात धोरण मान्य करणे किंवा पक्ष सोडणे, असंही त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्पष्ट केलं.