मंत्रालयात आदित्य ठाकरेंविरोधात अबू आझमींची घोषणाबाजी

| Updated on: Sep 30, 2020 | 4:25 PM

समाजवादी पक्षाचे आमदार पार्टी आमदार अबू आझमी यांनी आज (30 सप्टेंबर) मंत्रालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या आहेत (Abu Azmi criticize Aaditya Thackeray).

मंत्रालयात आदित्य ठाकरेंविरोधात अबू आझमींची घोषणाबाजी
Follow us on

मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार पार्टी आमदार अबू आझमी यांनी आज (30 सप्टेंबर) मंत्रालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या आहेत (Abu Azmi criticize Aaditya Thackeray). आझमी यांनी मानखुर्द येथील एस. एम. एस. कंपनी बंद करावी या मागणीसाठी आंदोलन केलं. यावेळी त्यांनी आम्ही ठाकरे सरकारला पाठिंबा देऊनही ते आमचं काम ऐकत नाही, साधा फोनही उचलत नाही, असा आरोप केला.

अबू आझमी म्हणाले, “आम्ही ठाकरे सरकारला पाठिंबा दिलाय, पण ते आमचं काम ऐकत नाहीत. आदित्य ठाकरे साधा फोनही घेत नाही.” अबू आझमी यांनी मानखुर्द येथील एस. एम. एस. कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे. त्यासाठीच त्यांनी आदित्य ठाकरेंशी अनेकदा संपर्क केल्याचा दावा केला. मात्र, आदित्य ठाकरे त्यांच्या सरकारला आमचा पाठिंबा असतानाही आमचे साधे फोनही उचलत नसल्याची तक्रार आझमी यांनी केली आहे.

“बाबरी प्रकरणात पुरावे गोळा करणारी सीबीआय मोदी सरकारचे तळवे चाटत आहे : अबू आझमी”

अबू आझमी यांनी बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “आजचा दिवस पुन्हा एकदा भारतासाठी काळा दिवस आहे. बाबरी मशीद 1528 मध्ये बनवण्यात आली होती. 1949 मध्ये जबरदस्तीने मशिदीत मूर्ती ठेवण्यात आली. 1992 मध्ये ही मशीद पाडण्यात आली. हे सर्व जगाने पाहिलं आहे. जेव्हापासून केंद्रात मोदी सरकार आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सीबीआय, ईडी, आयटी, पोलीस या संस्थांना केवळ खेळणं बनवून टाकलं आहे. अयोध्या जमिनीच्या प्रकरणावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने मशीद पाडण्यात आली आणि तेथे मुर्ती ठेवण्यात आली हे चुकीचं झाल्याचं म्हटलं.”

“इतकी मोठी मशीद तोडण्यात आली आणि आज त्याचा एकही पुरावा शिल्लक नाही. आता या देशात हेच होणार आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून साध्वीला सोडण्यात आलं, पुरोहित यांनाही सोडण्यात आलं, मेजर उपाध्याय सुटले. माजी आयटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी मेहनत करुन या प्रकरणात पुरावे गोळा केले. मात्र, उद्या हमंत करकरे अप्रमाणिक असल्याचा दावा केला जाईल. तसेच मोदी सरकारचं खेळणं झालेल्या एनआयएला खरं मानलं जाईल. जर या देशाचा हाच नियम असेल तर भविष्यात खूप अंधःकार आहे,” असं अबू आझमी यांनी सांगितलं.

हेही वाचा :

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना योग्य वेळी लाथ मारली : अबू आझमी

मुख्यमंत्रीपदासाठी अबू आझमींची पसंती कुणाला?

संबंधित व्हिडीओ :

Abu Azmi criticize Aaditya Thackeray