Tukaram Mundhe : जेवणात 3 झुरळ सापडणं पुरेसं नसतं; तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईबाबत हे काय बोलली अभिनेत्री
Tukaram Mundhe : एका प्रसिद्ध अभिनेत्रीने IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कामगिरीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

सध्या राज्यात आएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे चांगलेच चर्चेत आहेत. सामान्यतः एखाद्या अधिकाऱ्याची ओळख त्याच्या पदावरून बनते. पण तुकाराम मुंढे यांच्या बाबतीत वेगळे आहे. २५ मे रोजी महाराष्ट्राच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) कमिशनरचे पद स्वीकारल्यानंतर, मुंढे यांनी संपूर्ण राज्यात घाऊक विक्रेते, उत्पादक, किरकोळ विक्रेते आणि रेस्टॉरंट्सवर छापेमारीचा मोहीम राबवली आहे. जिथे जिथे गंभीर गडबड आढळली, तिथे कारवाई करण्यात आली. परवाना निलंबित करणे, नमुने जप्त करणे आणि कायदेशीर कारवाई सुरू करणे असे सर्वकाही झाले. अनेकजण तुकाराम मुंढे यांचे अनेक चाहते झाले आहेत. दरम्यान, एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
कोण आहे ती अभिनेत्री?
‘साथ निभाना साथिया’ या टीव्ही शोमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ते प्रत्येक मुद्द्यावर बिनधास्तपण मत मांडताना दिसते. नुकतान तिने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. देवोलीनाने महाराष्ट्राच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन कमिशनर तुकाराम मुंढे यांची प्रशंसा केली आहे.
वाचा: धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंडेंना सरकारकडून किती पगार मिळतो?
Imagine…one honest officer has shaken the entire Maharashtra, and the public is applauding his work. If every department had officers like him, criminals would think a hundred times before breaking the law.
Sadly, as per the judiciary, even finding three cockroaches in food… https://t.co/D0HQOjMTgC
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) August 13, 2026
अभिनेत्री नेमकं काय म्हणाली?
देवोलीना यांनी एक्स सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने, ‘विचार करा… एका प्रामाणिक अधिकाऱ्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकला आहे आणि लोक त्यांच्या कामाची प्रशंसा करत आहेत. जर प्रत्येक विभागात त्यांच्यासारखे अधिकारी असतील, तर गुन्हेगार कायदा मोडण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील. दुःखाची बाब म्हणजे न्यायव्यवस्थेनुसार, खाण्यात तीन झुरळे सापडपणं पुरेसं नसतं. त्याने परवाना रद्द करता येत नाही. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की मुंढे सर यांची किती वेळा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे’ असे म्हटले आहे.
२१ वर्षांत २५ वेळा झाल्या बदल्या
जर आपण अधिकारी मुंढे यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांना सर्वात वेगळे बनवणारी गोष्ट केवळ छापेमारी नाही, तर त्यांचा करिअर ग्राफ आहे. २१ वर्षांच्या सेवेत त्यांची २५ वेळा बदली झाली आहे. ही संख्या त्यांच्या ओळखीचा तितकाच महत्त्वाचा भाग बनली आहे, जितके त्यांचे काम.