Narayan Rane: आता महाराष्ट्राच्या सत्तेकडे पाहणार, सिंधुदुर्ग बँकेच्या विजयानंतर नारायण राणेंचं सूचक विधान

| Updated on: Dec 31, 2021 | 3:53 PM

जिल्हा बँकेनंतर आता लक्ष्य महाराष्ट्र सरकार. अजून अडीच वर्ष आहे विधानसभा. तिन्ही जिल्ह्यातील विधानसभा आणि खासदार हा भाजचाच असेल. गड आला की सिंह गेला यापेक्षा आम्ही असे राजकारणी आहोत की गड न जाऊ देता आम्ही सत्ता जिंकतो, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.

Narayan Rane: आता महाराष्ट्राच्या सत्तेकडे पाहणार, सिंधुदुर्ग बँकेच्या विजयानंतर नारायण राणेंचं सूचक विधान
भाजप नेते नारायण राणे
Follow us on

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील विजय हा माझा नव्हे तर भाजपचा आहे. जिल्ह्यातील देवी-देवता आणि जनतेचा आहे. आता महाराष्ट्राच्या सत्तेकडे आमचे लक्ष आहे, असे वक्तव्य भाजप नेते नारायण राणे यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील मतमोजणीनंतर भाजपचा विजय घोषित झाला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर तुमची सत्ता आली, यावर काय प्रतिक्रिया द्याल, असे विचारले असता, नारायण राणे म्हणाले, ‘ ही सत्ता माझी नाही. भाजपची सत्ता आली आहे. जिल्ह्यातील देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादाने ही सत्ता आली आहे. माझे कार्यकर्ते आणि नितेश राणेंनी घेतलेली मेहनत. राजन तेली आणि निलेश राणेंनी दिलेली साथ. यामुळे हा विजय मिळवला. हा विजय मिळवताना अक्कलेचा वापर झाला. अक्कल ज्याला आहे, त्याच्या ताब्यात देवदेतांनी बँक दिली आहे. नितेश आणि निलेशसह कार्यकर्त्यांना हे श्रेय आहे. सिंधुदुर्गाचा विजय हा आमच्या देवदेवतांनी मिळवलेला विजय आहे, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.

आता महाराष्ट्राच्या सत्तेकडे लक्ष

नारायण राणे म्हणाले, जिल्हा बँकेनंतर आता लक्ष्य महाराष्ट्र सरकार. अजून अडीच वर्ष आहे विधानसभा. तिन्ही जिल्ह्यातील विधानसभा आणि खासदार हा भाजचाच असेल. गड आला की सिंह गेला यापेक्षा आम्ही असे राजकारणी आहोत की गड न जाऊ देता आम्ही सत्ता जिंकतो. आमची दिल्लीपर्यंत सत्ता आहे. आता महाराष्ट्राकडे लक्ष म्हणजे काय तिकडे आमची सत्ता नाही. थोडक्यात हुकली. महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांची आणि चांगल्या सत्तेची गरज आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री नाही.

इतर बातम्या-

Sindhudurg District Bank Election Result | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक भाजपने जिंकली, कोणाचा विजय कोण पराभूत ? पूर्ण यादी एका क्लिकवर

Sindhudurg Bank Election Result | ‘राणें’चा विजय, पण भाजप उमेदवार पराभूत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील interesting निकाल