AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sindhudurg Bank Election Result | ‘राणें’चा विजय, पण भाजप उमेदवार पराभूत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील interesting निकाल

महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल आणि भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक समृद्धी पॅनल रिंगणात होते. 19 पैकी 11 जागांवर भाजप विजयी झाले, तर महाविकास आघाडीने 8 जागा जिंकल्या आहेत.

Sindhudurg Bank Election Result | 'राणें'चा विजय, पण भाजप उमेदवार पराभूत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील interesting निकाल
Satish Sawant, Nitesh Rane
| Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 31, 2021 | 1:21 PM
Share

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक (Sindhudurg District Bank Election) निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवली असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष निकालाकडे लागलं होतं. अखेर राणेंनी बाजी मारत सत्ता खेचून आणली, तर उमेदवार सतीश सावंत (Satish Sawant) पराभूत झाल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत ज्या दोन महिला प्रतिनिधी निवडून आल्या, त्यापैकी एक महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत, मात्र त्यांचं आडनाव योगायोगाने ‘राणे’ आहे.

महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल आणि भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक समृद्धी पॅनल रिंगणात होते. 19 पैकी 11 जागांवर भाजप विजयी झाले, तर महाविकास आघाडीने 8 जागा जिंकल्या आहेत.

महिला प्रतिनिधींचा निकाल

नीता राणे (महाविकास आघाडी) – विजयी अस्मिता बांदेकर (भाजप) – पराभूत

प्रज्ञा ढवण (भाजप) – विजयी अनोरोजीन लोबो (महाविकास आघाडी) पराभूत

महाविकास आघाडीचा पराभव, राणेंची सरशी

सिंधुदुर्ग जिल्हा बँक 2008 ते 2019 पर्यंत म्हणजे तब्बल 11 वर्ष नारायण राणे यांच्या ताब्यात होती. मात्र 2019 मध्ये बँक शिवसेनेच्या ताब्यात गेली. तब्बल अकरा वर्षांपासून राणे यांच्या हाती सत्ता असलेली बँक शिवसेनेच्या ताब्यात गेल्यामुळे राणे यांनी ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवलेली होती. याचे फळ अखेर राणे यांना मिळाले आहे. आता या बँकेवर भाजपची सत्ता असेल.

तेलींचा पराभव, दळवींचा विजय

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाला, तर महाविकास आघाडीचे सुशांत नाईक विजयी झाले. तर मतदान करु न शकलेले आणि संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी असलेले भाजपचे मनिष दळवी यांचा विजय झाला.

ईश्वरचिठ्ठीने सतीश सावंत पराभूत

महाविकास आघाडीला मोठा धक्का देणारी बातमी म्हणजे सतीश सावंत यांचा पराभव. भाजप उमेदवार विठ्ठल देसाई आणि सतीश सावंत यांना समसमान मतं मिळाली होती. यावेळी ईश्वरचिठ्ठीद्वारे निकाल काढण्यात आला. त्यानंतर देसाईंना कौल मिळाल्याने सतीश सावंत यांना पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर भाजपकडून जल्लोष करण्यात आला, तर शिवसेनेच्या गोटात शांतता पसरली.

विजयी उमेदवार

1) शेती संस्था मतदारसंघ कणकवली तालुका

विठ्ठल देसाई (भाजप)- विजयी सतीश सावंत (महाविकास आघाडी) – पराभूत

2) शेती संस्था मतदारसंघ कुडाळ तालुका

विद्याप्रसाद बांदेकर (महाविकास आघाडी) – विजयी प्रकाश मोर्ये (भाजप)- पराभूत सुभाष मडव (अपक्ष)- पराभूत

3) शेती संस्था मतदारसंघ सावंतवाडी तालुका

विद्याधर परब (महाविकास आघाडी)- विजयी गुरुनाथ पेडणेकर (भाजप)- पराभूत

4) शेती संस्था मतदारसंघ मालवण तालुका

व्हिक्टर डान्टस (महाविकास आघाडी) – विजयी कमलाकांत कुबल (भाजप) – पराभूत

5) शेती संस्था मतदारसंघ वेंगुर्ला तालुका

मनीष दळवी (भाजप) – विजयी विलास गावडे (महाविकास आघाडी) – पराभूत

6) शेती संस्था मतदारसंघ देवगड तालुका

प्रकाश बोडस (भाजप) – विजयी अविनाश माणगावकर (महाविकास आघाडी) – पराभूत

7) शेती संस्था मतदारसंघ दोडामार्ग तालुका

गणपत देसाई (महाविकास आघाडी) – विजयी प्रकाश गवस (भाजप) – पराभूत

8) शेती संस्था मतदारसंघ वैभववाडी तालुका

दिलीप रावराणे (भाजप) – विजयी दिगंबर पाटील (महाविकास आघाडी) – पराभूत

9) नागरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघ

सुशांत नाईक (महाविकास आघाडी) – विजयी राजन तेली (भाजप) – पराभूत

10) महिला प्रतिनिधी

प्रज्ञा ढवण (भाजप) – विजयी अनोरोजीन लोबो (महाविकास आघाडी) – पराभूत

11) महिला प्रतिनिधी

नीता राणे (महाविकास आघाडी)- विजयी अस्मिता बांदेकर (भाजप)- पराभूत

12) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ

आत्माराम ओटवणेकर (महाविकास आघाडी) – विजयी सुरेश चौकेकर (भाजप) – पराभूत

13) इतर मागास मतदारसंघ

रवींद्र मडगावकर (भाजप) – विजयी मनिष पारकर (महाविकास आघाडी) – पराभूत

14) विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ

मेघनाथ धुरी (महाविकास आघाडी) – विजयी गुलाबराव चव्हाण (भाजप) – पराभूत

15) सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघ

अतुल काळसेकर (भाजप) – विजयी सुरेश दळवी (महाविकास आघाडी) – पराभूत

16) औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघ

गजानन गावडे (भाजप) – विजयी लक्ष्मण आंगणे (महाविकास आघाडी) – पराभूत

17) मच्छीमार संस्था सर्व दुग्ध संस्था कुक्कुटपालन, वराहपालन जनावरे पैदास करणाऱ्या संस्था मतदारसंघ

महेश सारंग (भाजप)- विजयी मधुसूदन गावडे (महाविकास आघाडी)- पराभूत

18) विणकर संस्था घरबांधणी संस्था देखरेख संस्था तसेच अंतर्भूत नसलेल्या सर्व सहकारी संस्था

संदीप परब (भाजप)- विजयी विनोद मर्गज (महाविकास आघाडी)- पराभूत

19) कायद्याखाली नोंदविलेल्या सभासद संस्था सर्व बिगर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदार संघ

समीर सावंत (भाजप)-विजयी विकास सावंत (महाविकास आघाडी)- पराभूत

संबंधित बातम्या :

Sindhudurg Bank Election Result | राणेंनी वचपा काढला ! सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता, महाविकास आघाडीला जबर हादरा

सिंधुदुर्गाची माती आहे, इथं खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो; नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणेंचं वर्चस्व; 19 पैकी 10 जागा जिंकल्या; आता कसं वाटतंय… गार गार वाटतंय भाजपचा जल्लोष

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?