विखे पाटलांच्या कट्टर समर्थकाची भाजपला सोडचिठ्ठी, पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार

| Updated on: Mar 21, 2021 | 5:42 PM

राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब हराळ हे राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत. (ahmednagar balasaheb harale join ncp)

विखे पाटलांच्या कट्टर समर्थकाची भाजपला सोडचिठ्ठी, पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
BALASAHEB HARALE
Follow us on

अहमदनगर : जळगाव आणि सांगली माहपालिकेमध्ये आघाडीने आस्मान दाखवल्यानंतर आता भाजपला आणखी एक झटका बसला आहे. माजी मंत्री आणि भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब हराळे (Balasaheb Harale) हे राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत. बाळासाहेब हराळ हे विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते असून जिल्हापरिषदेचे ते माजी सदस्य आहेत. (Ahmednagar BJP leader Balasaheb Harale will join the NCP  in presence of Sharad Pawar)

मुंबईत पवारांच्या उपस्थितीत प्रवेश

मनसुख हिरेन, सचिन वाझे आणि आता परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे मागील काही दिवसांपूसन महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याचे म्हटले जात आहे. मात्र, असे असले तरी राज्यात पक्षीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. सांगली आणि जळगामध्ये सत्ता मिळवल्यानंतर आघाडीच्या घटकपक्षांचा आत्मविश्वास दुणावला आहे. भाजपचे अनेक नेते कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ हेसुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थिती हराळ यांचा पक्षप्रवेश होईल.

त्यासाठी हराळ यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक  झाली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थित ही बैठक पार पडली. हराळ यांचा पक्षप्रवेश निश्चित असून यांच्या पत्नी काँग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार

बाळासाहेब हराळ यांचा राष्ट्रावादी प्रवेश निश्चित झाल्यानंतर “मी या आधीच अनेक जण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते, असे वक्तव्य तनपुरे यांनी केले. तसेच हराळ यांच्या प्रवेशानंतर नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं प्रस्थ वाढणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

दरम्यान, सांगली आणि जळगाव महापालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये आघाडीच्या तिन्ही पक्षांनी मिळून भाजपला आस्मान दाखवलं. सांगली महापालिकेमध्ये भाजपचे नगरेसवक फोडून राष्ट्रवादी-काँग्रेसने सत्ता काबीज केली. तर जळगावमध्ये शिवसेनेने भाजपचे तब्बल 27 नगरसेवक फोडून महापालिकेवर भगवा फडकवला. त्यांनतर आता हराळ यांच्या रुपात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

इतर बातमी :

शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी; जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

(Ahmednagar BJP leader Balasaheb Harale will join the NCP  in presence of Sharad Pawar)