सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच, एम्सचा रिपोर्ट, आघाडीच्या नेत्यांची भाजपकडे माफीची मागणी

| Updated on: Oct 04, 2020 | 11:32 PM

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून ती आत्महत्याच असल्याचं एम्सच्या (AIIMS) अहवालातून समोर आलंय (AIIMS report clear that Sushant death by Suicide not by murder).

सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच, एम्सचा रिपोर्ट, आघाडीच्या नेत्यांची भाजपकडे माफीची मागणी
खरंतर, सुशांतच्या आत्महत्येवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सुशांतने आत्महत्या केली होती की त्याची हत्या करण्यात आली यावर मोठा सस्पेन्स पाहायला मिळाला. सुशांतने आत्महत्या नाही तर त्याची हत्या करण्यात आली असं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसून ती आत्महत्याच असल्याचं एम्सच्या (AIIMS) अहवालातून समोर आलंय (AIIMS report clear that Sushant death by Suicide not by murder). सुशांत प्रकरणावरुन महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवरही अनेक आरोप झाले होते. त्यामुळं आता बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी करत सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सुशांतचा रिपोर्ट आल्यानंतर महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये या मुद्द्यावरुन जोरदार सामना रंगतोय.

सुशांतच्या रिपोर्टनंतर सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. ‘महाराष्ट्रद्रोह्यांनो उत्तर द्या, माफी मागा’, अशी मागणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपकडून आता शवविच्छेदनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एम्सचा अहवाल आणि त्यानंतर सुरु झालेले हे राजकीय आरोप-प्रत्यारोप चर्चेचा विषय आहेत. एम्सच्या अहवालातून सुशांतची हत्या झाल्याची थेअरी नाकारण्यात आली. त्यानंतर आता शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीय. सुशांत प्रकरणाच्या तपासादरम्यान छाती बडवून घेणारे आता का गप्प? असा सवात परिवहन मंत्री अनिल परबांनी उपस्थित केलाय.

दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं देखील आक्रमक पवित्रा स्वीकारलाय. सुशांत प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी योग्य तपास केल्याचं सिद्ध झाल्याचं नवाब मलिकांनी सांगितलं. त्यामुळं आता महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करणाऱ्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केली. सुशांत प्रकरण लांबवणं हे भाजपचं षडयंत्र आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतानी केलाय.

महाविकास आघाडीच्या हल्ल्यानंतर आता भाजपनं सुशांतच्या पोस्टमॉर्टेमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. मुंबई पोलिसांनी शवविच्छेदन अहवालच नीट केला नसल्याचा आरोप किरीट सोमय्यांना केलाय. तर बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी राज्य सरकारनं कारवाई का केली नाही? असा सवाल आमदार राम कदमांना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विचारलाय.

एकंदरीतच, ज्या सुशांत सिंह प्रकरणामुळे कंगना रनौत आणि इतरांनी मुंबई पोलिसांवर बेछूट आरोप केले, ते सर्व आरोप एम्सच्या अहवालानंतर चुकीचे ठरले आहेत. त्यामुळंच सीबीआय चौकशी सुरु झाल्यानंतर काहीसे बॅकफूटवर गेलेले सत्ताधारी आता फ्रंटफूटवर येऊन टीका करतायेत. पण, मागील काळात मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची झालेली बदनामीची भरपाई कशी होणार? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे.

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput Case | मुंबईला बदनाम करण्याचे कारस्थान, खोट्यांचे पितळ उघडे पडले, महापौर किशोरी पेडणेकरांचा पलटवार

“महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांचा शोध घ्या”, सचिन सावंत यांची भाजपावर टीका

Gupteshwar Pandey | गुप्तेश्वर पांडेंचा चकवा, भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, राजकीय पक्ष ठरला!

संबंधित व्हिडीओ :

AIIMS report clear that Sushant death by Suicide not by murder