पवार साहेबांचा आदर करुन परत या, जयंत पाटलांचं अजित पवारांना आवाहन

| Updated on: Nov 24, 2019 | 6:15 PM

"राज्याच्या हितासाठी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे, त्याचा आदर ठेवून आपण परत या," असे जयंत पाटील (Jayant patil answer ajit pawar tweet) म्हणाले.

पवार साहेबांचा आदर करुन परत या, जयंत पाटलांचं अजित पवारांना आवाहन
Follow us on

मुंबई : “मी राष्ट्रवादीमध्ये आहे, आणि कायम राष्ट्रवादीसोबत राहीन. शरद पवार साहेबच आमचे नेते आहेत,” असं ट्वीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं (Jayant patil answer ajit pawar tweet) आहे. या ट्विटला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भावनिक आवाहन करत परत येण्याची साद घातली (Jayant patil answer ajit pawar tweet) आहे. “राज्याच्या हितासाठी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे, त्याचा आदर ठेवून आपण परत या,” असे जयंत पाटील (Jayant patil answer ajit pawar tweet) म्हणाले.

“अजित पवार आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहात. आदरणीय पवार साहेबांच्या सावलीत आपण सगळेच वाढलो आहोत. मात्र, राज्याच्या हितासाठी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे. साहेबांच्या या निर्णयाचा आदर ठेवून आपण परत या.” असे ट्विट जयंत पाटील यांनी केलं (Jayant patil answer ajit pawar tweet) आहे.

काही मिनिटांपूर्वी अजित पवार भाजपच्या प्रत्येक नेत्याचे आभार मानणारे ट्वीट करुन अजित पवारांनी ‘घरवापसी’ न करण्याचे संकेत दिले होते.


आमची भाजप-राष्ट्रवादी आघाडी पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात एक स्थिर सरकार देईल. ही आघाडी राज्य आणि लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करेल, अशी हमी अजित पवारांनी ट्विटद्वारे दिली.

‘काळजी करण्याची गरज नाही, सर्व काही ठीक आहे. मात्र थोडा संयम आवश्यक आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल तुमचे आभार’ असंही अजित पवार पुढे म्हणाले.

बंडानंतर अजित पवारांचे 10 मिनिटांत 16 ट्विट

उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. त्यानंतर रविवारी संध्याकाळच्या सुमारास अजित पवारांनी एकामागून एक ट्वीट करण्यास सुरुवात केली. अजित पवार यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार (Jayant patil answer ajit pawar tweet) मानले.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद, आपण राज्याला एक स्थिर सरकार देऊ. जे लोकहितासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करेल’ असं त्यांनी ट्विटवर म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक भाजपच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे आभार मानले.

संबंधित बातम्या :

भाजप की राष्ट्रवादी? अजित पवारांचं उत्तर