बंडानंतर अजित पवारांचे 10 मिनिटांत 16 ट्विट

राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं चित्र आहे. यानंतर नुकतंच अजित पवारांनी ट्विटरवर सक्रीय झाले (Ajit pawar tweet thanks to bjp leader) आहेत.

बंडानंतर अजित पवारांचे 10 मिनिटांत 16 ट्विट

मुंबई : राज्याच्या राजकारणात रातोरात भूकंप (Ajit pawar tweet thanks to bjp leader) झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ (Ajit pawar tweet thanks to bjp leader) घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं चित्र आहे. यानंतर नुकतंच अजित पवार ट्विटरवर सक्रीय झाले आहेत. अजित पवार यांनी गेल्या 10 मिनिटात तब्बल 16 ट्विट केले आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांनी भाजप नेत्यांचे आभार मानले (Ajit pawar tweet thanks to bjp leader) आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद, “आपण राज्याला एक स्थिर सरकार देऊ. जे लोकहितासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करेल. असे त्यांनी ट्विटवर म्हटंल आहे. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक भाजपच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे आभार मानले (Ajit pawar tweet thanks to bjp leader) आहे.

अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यानंतर गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी, राजनाथ सिंह, पियूष गोयल, जे.पी.नड्डा, यासारख्या अनेक नेत्यांचे आभार मानले आहेत. अजित पवार यांनी गेल्या 10 मिनिटात तब्बल 16 ट्विट करत भाजपच्या नेत्यांचे आभार मानले (Ajit pawar tweet thanks to bjp leader) आहेत.

याशिवाय अजित पवार यांनी ट्विटरवरील स्वत:ची माहितीमध्येही बदल केला आहे. त्यांनी त्यांच्या नावाखाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. त्याशिवाय पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असेही लिहिले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

अजित पवार यांनी बंड करत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. संख्याबळ दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना भुलवून त्यांनी राजभवनावर नेल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली. परंतु पक्षातील त्यांचं सदस्यत्व कायम (NCP leaders Conviencing Ajit Pawar ) आहे.

संबंधित बातम्या : 

‘हे’ चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील : सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या आमदारांची ‘घरवापसी’, संख्याबळ किती?

सुप्रियाताई अभिनंदन, दिग्विजय सिंह यांच्या शुभेच्छा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI