‘हे’ चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील : सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर माध्यमांवर समोर येऊन बोलणे टाळले (Supriya Sule WhatsApp Status).

'हे' चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील : सुप्रिया सुळे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर माध्यमांवर समोर येऊन बोलणे टाळले (Supriya Sule WhatsApp Status). असं असलं तरी त्या व्हॉट्सअॅप स्टेटसमधून आपल्या भावना व्यक्त करत आहेत (Supriya Sule WhatsApp Status). राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांची मनधरणी करण्यात अपयश आल्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी नवं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा साताऱ्यातील सभेचा पावसात भिजतानाचा फोटो ठेवला आहे. या फोटोवर हे चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा देत राहील, असं म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या संबंधित फोटोसह म्हटले आहे, “लोकांच्या सेवेसाठी आम्ही पुन्हा एक मजबूत टीम बांधू. आमच्याकडे सर्वोत्तम आदर्श आहे. आम्ही प्रामाणिकपणा, सन्मान आणि कठोर परिश्रमाच्या बळावर पुन्हा उभे राहू.”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडझडीच्या काळात सोबत उभे राहणाऱ्यांचेही सुप्रिया सुळेंनी आभार मानले आहेत. हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता. या दिवसाने मला अधिक कणखर केले. या कठीण काळातही सोबत उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आभार, असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं.

सकाळी सुप्रिया सुळेंनी आणखी एक व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं. त्या त्या म्हणाल्या, “अखेरीस मुल्यांचाच विजय होईल. प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कधीही वाया जात नाही. हा मार्ग कठीण असतो मात्र, त्यात शाश्वतता असते.”

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI