Video : अजितदादांच्या कार्यक्रमात दारुड्याची एन्ट्री! दादा म्हणाले, लोक दुपारीच चंद्रावर जायला लागले… माझ्या तालुक्यात दारु धंदे नको

| Updated on: Sep 04, 2021 | 7:26 PM

अजित पवार यांच्या कार्यक्रमात एका दारुड्यानं एन्ट्री केली. हे पाहून अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं. अजितदादांनी आपल्या भाषणात माझ्या तालुक्यात दारु धंदे नकोत. लोकं दुपारीच चंद्रावर जायला लागलेत.. असं म्हणत तालुक्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Video : अजितदादांच्या कार्यक्रमात दारुड्याची एन्ट्री! दादा म्हणाले, लोक दुपारीच चंद्रावर जायला लागले... माझ्या तालुक्यात दारु धंदे नको
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us on

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देत असतात. मात्र आज त्यांच्याच कार्यक्रमात एका दारुड्यानं एन्ट्री केली. हे पाहून अजित पवार संतापल्याचं पाहायला मिळालं. अजितदादांनी आपल्या भाषणात माझ्या तालुक्यात दारु धंदे नकोत. लोकं दुपारीच चंद्रावर जायला लागलेत.. असं म्हणत तालुक्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Drunk man’s entry in Ajit Pawar’s program, Ajit Pawar’s instructions to close illegal trades)

बारामती तालुक्यातील कटफळ येथे ड्रोनद्वारे भूमापन सर्वेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी अजित पवार यांनी ड्रोनद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणाची प्रत्यक्ष पाहणी करत प्रात्यक्षिकासह माहिती घेतली. या प्रात्यक्षिकावेळी एक दारुडा चक्क नमस्कार घालत अजितदादांच्या पुढे आला. त्यावर अजित पवार यांनी हा तर दुपारीच चंद्रावर गेलाय असं म्हणताच पोलिस त्याला बाजूला घेऊन गेले.

‘लोकं दुपारीच चंद्रावर जायला लागलेत’

या प्रकारानंतर मुख्य सभेत अजित पवार यांचे भाषण सुरु असताना स्थानिक ग्रामस्थांनी गावात दारुबंदीची मागणी केली. त्यावर अजितदादांनी थेट उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना माझ्या तालुक्यात असले धंदे नकोत अशी सूचना केली. लोकं दुपारीच चंद्रावर जायला लागलेत. आज श्रावणी शनिवार आहे तरीही चाललंय. काहीजण व्यसनाधीन झाले की त्रास होतो.. त्यांना व्यसनापासून बाजूला ठेवायचं कामही आपण सर्वांनी केलं पाहिजे, असं आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केलं.

अजित पवार यांनी अनेकदा जाहीर कार्यक्रमात पोलिसांना दारु विक्रीसह अवैध धंदे बंद कण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आज चक्क अजितदादांच्या कार्यक्रमावेळी दारुड्याची एन्ट्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या खास शैलीत दारुधंद्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या. सोबतच व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी आपले कार्यकर्ते आणि नागरिकांना केली.

कुटुंब नियोजनाचं अजितदादांचं आवाहन

28 ऑगस्ट रोजी बारामतीमध्ये जानाई उजव्या कालव्याच्या पाईपलाईनचं भूमीपूजन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं होतं. त्यावेळी अजितदादांनी जनतेला मोलाचा सल्ला दिला. कुटुंब मर्यादित ठेवा, उगाच फलटण निर्माण करु नका. दोनवरच थांबा, अशा शब्दात कुटुंब नियोजनाचं आवाहन अजिदादांनी केलं. मी सकाळी 6 वाजता काम सुरु करतो. तेव्हा काहीजण घोरत असतात. काही सुर्यमुखी तर साखरझोपेत असतात. असा टोलाही अजित पवार यांनी आपल्या उशिरा उठणाऱ्या सहकाऱ्यांना आणि विरोधकांना लगावला होता.

अष्टविनायकांसाठी विकास आराखडा

अष्टविनायक देवस्थांनांबाबत बैठक घेणार असल्याचं सांगत एक विकास आराखडा तयार केला जाणार असल्याचंही अजित पवार म्हणाले. आता प्रत्येक ठिकाणी मास्टर प्लॅन करणार. अष्टविनायकाच्या ठिकाणी अधिकाधिक सुविधा असाव्यात, रस्ते असावेत असा आराखडा केला जात असल्याची माहिती त्यांनी दिलीय.

इतर बातम्या :

‘पवार आमचे मार्गदर्शक, पण खेडमध्ये वळवळणाऱ्या किड्यांचा बंदोबस्त करु’, खेडमध्ये संजय राऊतांचा घणाघात

राजू शेट्टींनी राष्ट्रवादी विरोधात शड्डू ठोकलाय? पवारांच्या स्पष्टीकरणानंतर राजू शेट्टी काय म्हणाले वाचा

Drunk man’s entry in Ajit Pawar’s program, Ajit Pawar’s instructions to close illegal trades