पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यासाठी आपण एकत्रित केंद्राकडे जाऊ, अजित पवारांची पुन्हा फडणवीसांना साद!

पेट्रोल डिझेलचे वाढते दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबार चाललेत, अशा परिस्थितीत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यासाठी आपण एकत्रित केंद्राकडे जाऊ, असं अजित पवार म्हणाले. | Ajit pawar

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यासाठी आपण एकत्रित केंद्राकडे जाऊ, अजित पवारांची पुन्हा फडणवीसांना साद!
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 7:43 AM

मुंबई :  पेट्रोल डिझेलचे वाढते दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबार चाललेत, अशा परिस्थितीत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्यासाठी आपण एकत्रित केंद्राकडे जाऊ, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षाला (opposition party) आवाहनवजा चिमटा काढला. तसंच पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra fadanvis) केंद्राकडे एकत्रित जाण्याची साद घातल्याची चर्चा सुरु आहे. (We need the support of the opposition Says DCM Ajit pawar over petrol Diesel Price)

आम्हाला तुमच्या साथीची गरज, अजित पवार यांचं विरोधकांना आवाहन

राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याची ओरड वारंवार विरोधक करत आहेत. राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी व्हावेत किंबहुना ते कायमस्वरुपी कमी असावेत यासाठी आम्हीही आग्रही आहोत. आम्हालाही वाचतं आपल्या राज्यातील नागरिकांना कमी दरात इंधन मिळावे. त्यासाठी केंद्र सरकारने लावलेले विविध प्रकारचे कर कमी करण्याची आवश्यकता आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला विरोधकांची साथ हवी आहे. चला आपण एकत्रित मिळून पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी केंद्राकडे एकत्रित मागणी करु, असं अजित पवार म्हणाले.

अर्थसंकल्पावरील चर्चेच्यावेळी अजित पवारांचं जोरदार भाषण

अर्थसंकल्पावरील चर्चेच्यावेळी (Maharashtra Budget Session 2021) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जोरदार भाषण केलं. या भाषणात त्यांनी सरकारची वर्षभरातील कामगिरी मांडली तसंच कोरोना काळात केलेल्या कामाचा पाढा वाचला. तसंच ठाकरे सरकारने आणलेल्या लोकहिताच्या योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. याचवेळी त्यांनी विरोधकांनाही फैलावर घेत त्यांना झोडपून काढलं.

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन अजित पवारांचे विरोधकांना टोले, टोमणे आणि चिमटे

संपूर्ण अधिवेशन काळात विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर वचक ठेली. प्रत्येक मुद्द्यावर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर भारी पडल्याचं चित्र निर्माण झालं. संजय राठोड, मनसुख हिरेन, सचिन वाझे अशा मुद्द्यांवर सत्ताधारी बॅकफूटला गेले होते. साहजिक ठाकरे सरकारच्या टप्प्यात असलेले वा विरोधकांना टार्गेट करता येईल असा मुद्दा होता, तो म्हणजे दिवसागणिक होणारी इंधन दरवाढ… याच मुद्द्यांवरुन अजित पवारांनी विरोधकांना टोले टोमणे लगावले.

विरोधी पक्षांनी मांडलेले मुद्दे खोडून काढत अजित पवारांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. इंधन दरवाढीला राज्य नाही, तर केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. तसंच केंद्राने पेट्रोल डिझेलवर लावलेले विविध कर कमी करावेत, असंही ते यावेळी म्हणाले.

(We need the support of the opposition Says DCM Ajit pawar over petrol Diesel Price)

हे ही वाचा :

फडणवीसांनी अधिवेशन गाजवल्याच्या चर्चा मात्र राऊत म्हणतात, ‘विरोधी पक्ष काय करतोय?’

अधिवेशनाची सुरुवात राजीनाम्याने, शेवट बदलीने, देवेंद्र फडणवीसांच्या आक्रमकतेला अभ्यासाची जोड

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.