भाजप प्रवेशाच्या हालचाली, आमदार जयकुमार गोरेंविरोधात सर्वपक्षीयांचा एल्गार

| Updated on: Jul 15, 2019 | 5:49 PM

जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण-खटावचे आमदार आहेत. मतदारसंघातील सर्वपक्षीयांनी त्यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एक बैठकही झाली.

भाजप प्रवेशाच्या हालचाली, आमदार जयकुमार गोरेंविरोधात सर्वपक्षीयांचा एल्गार
Follow us on

सातारा : काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे हे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मदत केल्यामुळे चर्चेत होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय. जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण-खटावचे आमदार आहेत. मतदारसंघातील सर्वपक्षीयांनी त्यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची एक बैठकही झाली. या बैठकीत गोरे बंधूंना माण-खटावच्या स्थानिक नेत्यांनी एकमुखी विरोध दर्शवला.

स्थानिक राजकारण तापण्यास सध्या सुरुवात झाली असली तरी जयकुमार गोरेंनी मौन बाळगणंच पसंत केलंय. साताऱ्यात सर्वपक्षीय बैठकीत भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, भाजपचे उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख, रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुभाष नरळे यांच्यासह तालुक्‍यामधील विविध पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते.

जयकुमार गोरे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात माण तालुक्‍यातील विकास रखडवला असल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आलाय. शिवाय माणमध्ये गोरे बंधूंनी तालुक्‍यात गुंड प्रवृत्तीस चालना दिल्यामुळे या पुढील काळात तालुक्‍याच्या विकासाच्या आड येणाऱ्या अशा प्रवृत्तीस थोपविण्याचा निर्धार सर्वपक्षीय निर्णय नेत्यांनी घेतला. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्यामुळे जयकुमार गोरेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत

लोकसभा निवडणुकीवेळी सातारा जिल्ह्यातील माणचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी महायुतीच्या रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिला  होता. “ज्या पक्षाने मला आमदारकीचे सुख लाभू दिले नाही, आमदार झाल्यानंतर तीन दिवसानंतर माझ्यावर हत्त्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल करुन एकापाठोपाठ एक खोटे गुन्हे दाखल केले, वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मला अडचणीत आणले. यामुळे यापुढील काळात माढाचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना माझा पाठिंबा असेल.” असं आमदार जयकुमार गोरे म्हटले होते.

संबंधित बातम्या :

लोकसभेला भाजपचा प्रचार, तरीही जयकुमार गोरे काँग्रेसच्या प्रतोदपदी!

राधाकृष्ण विखेंच्या गाडीत जयकुमार गोरे, थेट भाजपात जाणार?

लोकसभा निवडणुकीत भाजपला जाहीर मदत, विधानसभेबाबत आमदार जयकुमार गोरे म्हणतात…

पिसाळलेले कुत्रे चावल्यास या वयात इंजेक्शन सोसणार नाही, गोरेंचं रामराजेंना उत्तर