रथातून उतरताना पाय घसरला, अमित शाह जमिनीवर कोसळले

| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

भोपाळ : निवडणुकीच्या मैदानात भल्याभल्यांना पाडणारे भाजपाध्यक्ष अमित शाह स्वतःच पडले. पण अमित शाह निवडणुकीच्या नाही, तर खऱ्याखुऱ्या ठिकाणी पडले. मध्य प्रदेशात एका रॅलीमध्ये रथातून उतरताना त्यांचा पाय घसरला आणि ते जमिनीवर कोसळले. या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मध्य प्रदेशातील अशोकनगरच्या तुलसी पार्कमध्ये रॅली अंतिम टप्प्यात आली असताना अमित शाह रथातून खाली उतरत […]

रथातून उतरताना पाय घसरला, अमित शाह जमिनीवर कोसळले
Follow us on

भोपाळ : निवडणुकीच्या मैदानात भल्याभल्यांना पाडणारे भाजपाध्यक्ष अमित शाह स्वतःच पडले. पण अमित शाह निवडणुकीच्या नाही, तर खऱ्याखुऱ्या ठिकाणी पडले. मध्य प्रदेशात एका रॅलीमध्ये रथातून उतरताना त्यांचा पाय घसरला आणि ते जमिनीवर कोसळले. या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

मध्य प्रदेशातील अशोकनगरच्या तुलसी पार्कमध्ये रॅली अंतिम टप्प्यात आली असताना अमित शाह रथातून खाली उतरत होते. याचवेळी त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. सुरक्षा रक्षकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने उचलण्यात आलं.

मध्य प्रदेशात निवडणुकीचा फिव्हर आहे. अमित शाहांनी भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ अशोक नगरमध्ये दीड तासांचा भव्य रोड शो केला, ज्यामध्ये त्यांचं ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आलं. यानंतर त्यांनी शिवपुरी जिल्ह्यात एका सभेलाही संबोधित केलं आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सत्तेची स्वप्न पाहत असल्याचं म्हणत काँग्रेसवर टीकाही केली.

देशात दुर्बिनीतून पाहिलं तरीही काँग्रेसचं सरकार दूरदूरपर्यंत दिसून येत नाही. काँग्रेसला फक्त निवडणुकीच्या काळातच शेतकऱ्यांचा पुळका येतो. बटाटे जमिनीत येतात की कारखान्यातून ते तरी तुम्हाला माहितीये का, असा सवाल अमित शाहांनी राहुल गांधी यांना केला.

मतदारांसमोर दोन पक्ष आहेत, एक काँग्रेस आणि दुसरा भाजप. भाजपात मोदींच्या नेतृत्त्वात शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. आमच्यात सगळं काही ठरलेलं आहे. राहुल गांधींचा सेनापती कोण असा प्रश्न लोक आता विचारत आहेत, असं म्हणत अमित शाहांनी अबकी बार 200 का आकडा पार असा नारा दिला.

पाच राज्यांमध्ये निवडणुका

केंद्रीय निवडणूक आयोगाने छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली होती. छत्तीसगडमध्ये 12 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणूक झाली. तर मध्य प्रदेश आमि मिझोराममध्ये एकाच टप्प्यात 28 नोव्हेंबरला, तर तेलंगणा आणि राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात 7 डिसेंबरला मतदान होईल. त्यानंतर चारच दिवसात म्हणजे 11 डिसेंबरला पाच राज्यांचा निकाल लागणार आहे.

भाजपची राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात सत्ता आहे. तर या पाचपैकी केवळ मिझोराम काँग्रेसच्या हातात आहे. तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती, भाजप आणि काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत असेल.