मोदींची बारामतीतून माघार, आता अमित शाहांची सभा होणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीत होणारी सभा अचानक रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींऐवजी आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे बारामतीत सभा घेतील. येत्या 19 एप्रिल रोजी अमित शाह बारामतीत सभा घेणार आहेत. बारामतीतून शिवसेना-भाजप युतीकडून कांचन कुल मैदानात आहेत. बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुप्रिय सुळे रिंगणात आहेत. सुप्रिया सुळेंविरोधात भाजपने […]

मोदींची बारामतीतून माघार, आता अमित शाहांची सभा होणार
Follow us on

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीत होणारी सभा अचानक रद्द करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींऐवजी आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे बारामतीत सभा घेतील. येत्या 19 एप्रिल रोजी अमित शाह बारामतीत सभा घेणार आहेत. बारामतीतून शिवसेना-भाजप युतीकडून कांचन कुल मैदानात आहेत.

बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुप्रिय सुळे रिंगणात आहेत. सुप्रिया सुळेंविरोधात भाजपने मोठ्या प्रमाणात प्रचार सुरु केला आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना तर थेट बारामतीच्या पालकपदी नियुक्ती केली आहे. बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातही पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे 2014 साली मोदी लाटेतही राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे इथून विजयी झाल्या होत्या.

यंदा भाजपने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नातेवाईकही आहेत. त्यामुळे काहीशी कौटुंबिक किनारही इथल्या लढतीला आहे.

शरद पवारांपासून बारामतीचं नातं असल्याने, राष्ट्रवादीला इथे पराभूत करणं भल्याभल्यानं जमलं नसल्याचे चित्र आहे. मात्र यंदा भाजपने बारामतीत अक्षरश: कंबर कसली आहे. त्यामुळे लढत चुरशीची झाली आहे.

त्यात भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच सभा आयोजित करण्याचे ठरवले होते. मात्र, ऐनवेळी पंतप्रधान मोदींची सभा रद्द करुन, भाजपाध्यक्ष अमित शाह यांची सभा आयोजित केली आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत भाजप नेत्यांची काल रात्री एक बैठक झाली. व्यस्त वेळापत्रकामुळे पंतप्रधान मोदींनी बारामतीची सभा रद्द केल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.