MNS : सेनेची पडझड, मनसे संधीच्या शोधात, अमित ठाकरे 17 जुलैपासून मराठवाडा पिंजून काढणार..!

आता महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जो-तो पक्ष वाढविण्यावर भर देत आहे. शिवाय बंडखोरीमुळे शिवसेनेचे नुकसान तर झाले आहेच पण उद्भवलेल्या स्थितीचा फायदा घेण्यासाठी राजकीय नेते आता स्थानिक पातळीवर उतरले आहेत. यापूर्वी अमित ठाकरे यांनी कोकणात दौरा केला होता.

MNS : सेनेची पडझड, मनसे संधीच्या शोधात, अमित ठाकरे 17 जुलैपासून मराठवाडा पिंजून काढणार..!
अमित ठाकरेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 10:49 PM

मुंबई : सध्या आख्खं ठाकरे कुटुंब हे पक्ष विस्तारण्यासाठी राबतं असल्याचे चित्र आहे. (Shivsena) शिवसेनेतील बंडखोरी थांबता-थांबेना झाली आहे. त्यामुळे पक्ष प्रमुखांसह (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे ही अॅक्शनमोडमध्ये आहेत तर दुसरीकडे पक्ष वाढीसाठी मनसेचे (Amit Thackeray) अमित ठाकरेही रिंगणात उतरले आहेत. कोकणानंतर मनसे नेते अमित ठाकरे हे आता मराठवाडा पिंजून काढणार आहेत. 17 ते 24 जुलै दरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये त्यांचा दौरा राहणार आहे. दरम्यानच्या काळात ते विद्यार्थी सेनेच्या बैठका तर घेणार आहेतच पण पक्ष बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. जो तो पक्ष विस्तारण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र राज्यात पाहवयास मिळत आहे.

कोकणानंतर मराठवाड्यात पक्षाचा विस्तार

आता महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जो-तो पक्ष वाढविण्यावर भर देत आहे. शिवाय बंडखोरीमुळे शिवसेनेचे नुकसान तर झाले आहेच पण उद्भवलेल्या स्थितीचा फायदा घेण्यासाठी राजकीय नेते आता स्थानिक पातळीवर उतरले आहेत. यापूर्वी अमित ठाकरे यांनी कोकणात दौरा केला होता. जागोजागी पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि कार्यकर्त्यांशी संवाद त्यांनी साधला होता. तर आता दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यात संघटन उभारले जाणार आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये त्यांच्या बैठका राहणार आहेत.

8 दिवस 8 जिल्हे, पक्ष संघटनावर भर

पक्ष विस्ताराच्या अनुशंगाने मराठवाड्यात दाखल होत असलेले अमित ठाकरे हे आठ दिवस मुक्कामी असणार आहेत. आगामी काळात महापालिका निवडणुका आणि शिवसेनेतील बंडामुळे निर्माण झालेली दरी याचा फायदा घेण्यासाठी स्थानिक पातळीवर उतरत आहे. असाच प्रयत्न आता मनसे मराठवाड्यात करताना पाहवयास मिळत आहे. यापूर्वी विभागातील सर्वच जिल्ह्यामध्ये तो ही एकाच वेळी असा दौरा अमित ठाकरे यांचा झाला नव्हता. मात्र, यावेळी ते आठ दिवसांसाठी मराठवाड्यात येणार आहेत.

हे सुद्धा वाचा

तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये अमित ठाकरे हे विद्यार्थी सेनेच्या बैठका घेणार आहेत. यावेळी प्रत्यक्ष संघटनावर भर दिला जाणार आहे तर पदाधिकाऱ्यांच्या अडचणी काय आहेत का ? याचाही आढावा घेतला जाणार आहे. पक्ष बांधणीच्या अनुशंगाने हा दौरा महत्वाचा मानला जात असून यापूर्वी अमित ठाकरे औरंगाबादला राज ठाकरे यांच्या सभेच्या दरम्यान दाखल झाले होते.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.