
ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी उपमख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. अजित पवार हे नेहमीच भाजपाचे नेते अमित शाह यांच्या इशाऱ्यावर चालतात. आम्हाला निधी देताना अजित पवार यांच्या हाताला लकवा मारतो का? अशा शेलक्या शब्दांत होके यांनी अजितदादांना लक्ष्य केलं होतं. या टीकेनंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अतुल मिटकरी आणि हाके यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मिटकरी यांनी हाकेंना वायझेड म्हटलंय, हाकेंची त्यांनी औकातही काढलीय. तर दुसरीकडे जोपर्यं मिटकरी माझ्यावर टीका करत राहणार तोपर्यंत मी अजि पवार यांनी आणखी प्रश्न विचारत राहणार? असा पवित्रा घेतलाय.
लक्ष्मण हाके हा भुंकणारा कुत्रा आहे. त्यांना जास्त किंमत दिली नाही पाहिजे. ते महादेव जाणकर यांचे उपकार विसरले आहेत. त्यांच्यासोबत राहून हाके यांनी जानकर यांना दगा दिला. ते काय ओबीसी समाजाबद्दल बोलत आहे. सरकारने ओबीसी समाजासाठी किती काम केलं आहे, याची त्यांना कल्पना नाही. त्यांची लायकी नाही, अशी टोकाची टीका मिटकरी यांनी हाके यांच्यावर केली.
तसेच, लक्ष्मण हाके यांनी औकातीत रहावं. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी फक्त माझ्या शर्टच्या बटणाला हात लावून दाखवावा. त्यांना मराठी भाषा समजत नाहीये. वाय झेड नावाचा एक सिनेमा आहे आणि हा सिनेमा जाऊन पहावा, असा खोचक सल्ला मिटकरी यांनी हाके यांना दिला होता. नांदेडमधील भोकर मतदारसंघात हाके यांनी प्रहार संघटनेच्या उमेदवारासोबत काय केलं हे सर्वांना माहिती आहे. यासंदर्भात त्यांनी उत्तर देणं टाळलं आहे. हाके हे राज्य मागास आयोगाचे सदस्य कसे असू शकतात. हाके हे जातीयवादी आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. हाके यांना राज्य मागास आयोगावर कोणी घेतलं? हाके यांची पात्रता होती का? आगामी अधिवेशनात मी हा मुद्दा मांडणार आहे. अजित पवार यांच्यावर बोलण्याची त्यांची लायकी नाही. हाके यांनी आपल्या लायकीत राहावे, असा सल्लाही मिटकरी यांनी दिला.
तर मिटकरी यांच्या या टीकेला हाके यांनीदेखील जशास तसे उत्तर दिले आहे. जोपर्यंत मिटकरी वायझेड शब्दाचा अर्थ सांगणार नाहीत, तोपर्यंत मी अजित पवार यांचे कपडे फाडायचे सोडणार नाही. मी ओबीसींचे प्रश्न विचारतोय. अजित पवार यांनी यांच्या आमदाराला कमरेखालच्या शिव्या द्यायला ठेवलंय. अमोल मिटकरी जेवढी माझ्यावरती टीका करतील तेवढे मी अजित पवारांना जास्त प्रश्न विचारणार आहे, असा पलटवार हाके यांनी केला. तसेच मी लोकांचे प्रश्न मांडतोय आणि हे इकडं माझ्यावर खालची टिका करतायत. मिटकरी बोलतात वेगळं आणि दाखवतात वेगळं ते विरोधाभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मिटकरी हे अशा पक्षाचे प्रवक्ते आहेत ज्या पक्षाचे मालक नेहमी सत्तेत बसायचा प्रयत्न करतात. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खाली चाललाय. अजित पवार यांना हे समजायला हवे. मिटकरी यांना अजित पवारांचा पाठिंबा आहे, असं गंभीर आरोप हाके यांनी मिटकरी यांच्यावर केला.
तसेच, माझे जुने फोटो मॉर्फ करुन दाखवले जात आहेत. आम्ही गावाकडची लोक आहोत. आमची सुरुवात शिव्यांनीच होते. अमोल मिटकरी यांनी दोन शिव्या दिल्या तर मी अजित पवार यांना दहा प्रश्न विचारणार आहे. माझा लढा अजित पवार या वैयक्तिक माणसाबरोबर नाही माझा लढा प्रवृत्तीविरोधात आहे. अमोल मिटकरी यांना अजित पवार यांनी संधी दिली आहे. त्यांनी संविधानिक मार्गाने बोललं पाहिजे, असा सल्लाही हाके यांनी मिटकरी यांना दिला.