राज्यपाल कोश्यारी यांच्यावर अमोल मिटकरी यांची सडकून टीका, मिटकरी म्हणाले,…

छत्रपती शिवाजी महाराज बोलण्याचं औदार्य त्यांनी दाखविलं नाही. शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी शब्दात केला.

राज्यपाल कोश्यारी यांच्यावर अमोल मिटकरी यांची सडकून टीका, मिटकरी म्हणाले,...
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 6:08 PM

अकोला :  औरंगाबाद येथे आज विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ होता. या समारंभामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, महाराष्ट्राचे राज्यपाल हे वादग्रस्त वक्तव्य करण्यात पटाईत आहेत. जाणीवपूर्वक त्यांना प्रसिद्धीची हाव आहे का, असं वाटतं. मागच्या वेळीही त्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात मराठी माणसाच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलीत.

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात वक्तव्य केलं. ते वक्तव्य अत्यंत खालच्या पातळीवर बोलले. त्यावेळी त्यांनी माफी मागितली नाही. आज पुन्हा राज्यपाल यांनी जिभ उचलली नि टाळ्याला लावली.

मराठवाडा विद्यापीठातील दीक्षांत समारंभात शरद पवार व नितीन गडकरी उपस्थित होते. या दोघांनाही मानाची डिलीट विद्यापीठाकडून प्रदान झाली. पवार आणि गडकरी यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी. यासाठी त्यांच्या तोंडून एक बेताल वक्तव्य आलं.

छत्रपती शिवाजी महाराज बोलण्याचं औदार्य त्यांनी दाखविलं नाही. शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी शब्दात केला. कोणी गांधींना मानतात. कोणी सुभाष चंद्र बोस यांना मानतात. कोणी नेहरू यांना मानतात. असं बोलत असताना एकेरी उल्लेख करत होते, असं मिटकरी यांनी सांगितलं.

राज्यपाल कोश्यारी हे संघाचे प्रेमी आहेत. त्यामुळं ते या महापुरुषांना मानत नाहीत. राज्यपाल यांच्या काळ्या टोपीखालचा मेंदू सडका आहे. त्यामुळं ते या महामानवांना माननं शक्य नाही. त्यामुळं तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही. शिवाजी तर येथेच बसले आहेत.

शिवाजी महाराज यांची तुलना ही नितीन गडकरी यांच्यासोबत केली. सभा संपल्यानंतर गडकरी यांनी राज्यपाल यांची कानउघडणी केली असेल. शरद पवार आणि नितीन गडकरी हे दोन्ही सभ्य आणि सुसंस्कृत नेते आहेत. परंतु, गचाड वाणीनं राज्यपालांनी स्वताची प्रतिमा मलिन करून टाकली.

अशा राज्यपालाची हकालपट्टीचं झाली पाहिजे. म्हातारपणात माणसाची बुद्धी काम करत नाही. याचा प्रत्यय राज्यपाला कोश्यारी यांच्या रुपानं पुन्हा आला असल्याचंही मिटकरी म्हणाले.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.