चंद्रशेखर बावनकुळेंचं कोश्यारींबाबत महत्वाचं विधान, मिटकरी म्हणाले, ‘जोक ऑफ द इयर!’

| Updated on: Nov 23, 2022 | 3:36 PM

अमोल मिटकरींचा बावनकुळेंना टोला...

चंद्रशेखर बावनकुळेंचं कोश्यारींबाबत महत्वाचं विधान, मिटकरी म्हणाले, जोक ऑफ द इयर!
Follow us on

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्यावरून राजकारण तापलंय. यावरील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी टिप्पणी केली आहे. त्यांनी ट्विट करत बावनकुळेंच्या विधानाची खिल्ली उडवली आहे.

बावनकुळे यांचं विधान पेपरमध्ये छापून आलंय. त्याचा फोटो अमोल मिटकरींनी शेअर केलाय आणि त्याला ‘जोक ऑफ द इयर’ असं कॅप्शन दिलंय.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने काम करतात. ते जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा तेव्हा ते शिवरायांचा उल्लेख जरूर करतात. त्यांनी कधीही शिवरायांच्या प्रतिमेला ठेच पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही.पण औरंगाबादच्या कार्यक्रमात कोश्यारी जे बोलले त्याचं भारतीय जनता पक्ष समर्थन करत नाही, असं बावनकुळे यांनी म्हटलंय. त्याचा फोटो मिटकरींनी शेअर केलाय.

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पदवीदान समारंभ पार पडला. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना राज्यपाल कोश्यारी यांनी एक विधान केलं. त्यावर प्रचंड टीका झाली.

कोश्यारींचं वादग्रस्त विधान

तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे.