Amruta Fadnavis: त्यात काही गैर वाटत नाही…गरब्यात मुस्लिमांना प्रवेश न देण्याच्या मागणीवर अमृता फडणवीस यांची स्पष्ट भूमिका

Amruta Fadnavis: मंत्री नितेश राणे यांनी गरब्यामध्ये लव्ह जिहाद व्हायला नको, मुस्लिमांना प्रवेश द्यायला नको अशी मागणी केली. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी परखड मत मांडले आहे.

Amruta Fadnavis: त्यात काही गैर वाटत नाही...गरब्यात मुस्लिमांना प्रवेश न देण्याच्या मागणीवर अमृता फडणवीस यांची स्पष्ट भूमिका
Amruta Fadnavis
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 09, 2026 | 8:07 AM

गेल्या काही दिवसांपासून राज्याच सण साजरे करण्यावर वाद सुरु झाले आहेत. सण-उत्सावरुन राज्यात राजकीय पक्ष आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सवातील डीजे बंदीनंतर भाजप नेत्याने नवरात्रीबद्दल मोठे विधान केले. मंत्री नितेश राणे यांनी थेट गरब्यामध्ये लव्ह जिहाद व्हायला नको, मुस्लिमांना प्रवेश द्यायला नको असे म्हटले. आता या वादात मिसेस मुख्यमंत्र्यांनीही उडी घेतली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या? जाणून घ्या…

काय म्हणाले होते नितेश राणे?

नवरात्री उत्सव सुरु व्हायरला अजून जवळपास महिना बाकी आहे. मात्र, तो सुरु होण्याआधीच महाराष्ट्रात गरबा-दांडियावरुन राजकारण पेटले आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्यास विरोध केला आहे. जर मुस्लिमांना गरब्यात यायचं असेल तर त्यासाठी थेट धर्मांतराची अट घातली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र या भूमिकेला विरोध केला आहे.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या सर्वावर आपली परखड भूमिका मांडली आहे. ‘आपला उत्सव सर्वांचा समावेश करतो, एखादा मुस्लिम व्यक्ती जर गरब्यात येत असेल आणि नीट आनंद घेऊन जात असेल तर त्यात काही गैर वाटत नाही,’ असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.

पुढे डीजे बंदीबाबत विचारताच त्या म्हणाल्या, ‘सरकार आणि कोर्टाने जे नियम ठरवून दिले आहे त्याप्रमाणे सर्वांनी सणवार साजरी करावे. ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो त्या लोकांना त्रास व्हायला नको, धर्माचे पालन घरात जेवढं करू तेवढं चांगलं, बाहेर जे सणवार साजरे करतो ते नियमात राहून केले पाहिजे.’

मनसे नेते अमित ठाकरे यांनी देखील नितेश राणे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. ऐकलंत.. या आधी गरब्यात प्रवेश करतांना आधारकार्डची सक्ती करण्याची मागणी करण्यात आली आणि आता तर नितेश राणेंनी गैर-हिंदूंना थेट घरवापसीचा सल्ला देत धर्म बदल्याचं आव्हान दिलंय. मात्र हे केवळ दंगे घडवण्यासाठी केलं जात असल्याचा आरोप मनसे नेते अमित ठाकरेंनी केलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us