Anil Deshmukh : अनिल देशमुख यांना जेलमध्ये चक्कर, छातीत दुखत असल्यामुळे रुग्णालयात दाखल

| Updated on: Aug 26, 2022 | 4:34 PM

सीबीआयने देशमुख आणि त्यांचे वैयक्तिक सहकारी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार आरोप दाखल केले आहेत.

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांना जेलमध्ये चक्कर, छातीत दुखत असल्यामुळे रुग्णालयात दाखल
Anil Deshmukh : अनिल देशमुख यांना जेलमध्ये चक्कर, छातीत दुखत असल्यामुळे रुग्णालयात दाखल
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : अनिल देशमुख (Anil Deshmukh) तुरुंगात चक्कर येऊन पडले असल्याची माहिती मिळाली आहे. छातीत दुखत असल्याने त्यांना जेजे रुग्णालयात (J J Hospital) दाखल करण्यात आले आहे. माझी गृहमंत्री अनिल देखमुख यांना विविध व्याधी असल्यामुळे जेलमध्ये अनेक अडचणी येत आहेत. सध्या त्यांना चक्कर आल्यामुळे जेलमधील प्रशासन पुर्णपणे हादरून गेलं आहे. अनिल देखमुख यांचं वय देखील अधिक आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं आहे. याबाबत जेजे रुग्णालयाकडून कोणतंही अधिकृत वृत्त जाहीर केलेलं नाही. अनिल देखमुख राज्याचे गृहमंत्री (Home Minister) असताना त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

माजी मंत्री देशमुख यांच्यावर आरोपपत्र दाखल

सीबीआयने देशमुख आणि त्यांचे वैयक्तिक सहकारी संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार आरोप दाखल केले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे 71 वर्षीय नेते देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून मनी लाँड्रिंग प्रकरणात ते शहरातील आर्थर रोड तुरुंगात आहेत. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करत आहे. या वर्षी एप्रिलमध्ये, सीबीआयने देशमुख, त्यांचे सहकारी पालांडे आणि शिंदे यांना ताब्यात घेतले होते आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस कर्मचारी सचिन वाजे यांना बडतर्फ केले होते.

100 कोटी रुपयांच्या लाचखोरीचा आरोप

केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबईतील विशेष न्यायालयात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहेत. देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांच्या लाचखोरीच्या आरोपांच्या चौकशीच्या संदर्भात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोपपत्र दाखल केले आहेत. मुंबईतील विशेष न्यायालयाने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे यांची सरकारी साक्षीदार होण्यासाठी केलेली याचिका मान्य केली होती.