त्यांनी तर प्रत्येकवेळी देश तोडून राज्य केलं; अनुराग ठाकूर यांचा राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेवर हल्लाबोल

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आज मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आहेत. डोंबिवलीमध्ये बोलताना त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे.

त्यांनी तर प्रत्येकवेळी देश तोडून राज्य केलं; अनुराग ठाकूर यांचा राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेवर हल्लाबोल
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 2:24 PM

मुंबई:  केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आज मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आहेत. डोंबिवलीमध्ये बोलताना त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. इंग्रज भारत सोडून गेले, मात्र इंग्रजांची विचारधारा जपणारे काँग्रेस आज भारतात आहे. काँग्रेस पक्ष जो आज भारत जोडण्याची गोष्ट करतोय त्यांनी प्रत्येकवेळी भारत तोडून भारतावर राज्य केलं असं म्हणत अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसच्या भारत जोडो आंदोलनावर हल्लाबोल केला.

‘राजकीय फायद्यासाठी कुठल्याही स्थराला जाऊ शकतात’

पुढे बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, राहूल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या नावाखाली देशभरात फीरत आहेत, मात्र तिथे देखील ते एका धर्माला दुसऱ्या धर्माविरोधात भडकवण्याचं काम करत आहेत. राजकीय फायद्यासाठी ते कुठल्याही स्थराला जाऊ शकतात.

हिंदू धर्माला कायमच कमी दाखवण्याचं काम काँग्रेसने केलं आहे. मात्र आता हे कुठं तरी थांबायला हवं. कर्म आणि धर्म यांचा सन्मान झाला पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. आपण आज जगात अनेक देशांना मागे टाकून पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत.

हे सुद्धा वाचा

अयोध्येत भव्य राममंदिर

दरम्यान यावेळी ते राम मंदिरावर देखील बोलले आहेत. तुम्ही सर्व जण आज जय श्रीरामचा जयघोष करत आहात. मात्र त्यासाठी चारशे वर्षांपेक्षाही अधिक काळ आपल्याला लढा द्यावा लागला. रामलल्लाचा जन्म ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी आज त्याचं भव्य मंदिर बनत आहे. या मंदिरासाठी देखील गेले कित्येक वर्ष आपल्याला लढा द्यावा लागला. मात्र जेव्हा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने केंद्रात मोदी सरकार सत्तेत आले, तेव्हा ही वेळ बदलली. आपण न्यायालयीन लढा जिंकला आहे. पुढच्या वर्षभरात अयोध्येत भव्य असे राममंदीर तयार होईल असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.