Shivsena MP: उद्धव ठाकरेंना खूप मोठा झटका! शिवसनेचे तब्बल 12 खासदार शिंदे गटात सामील; आता फक्त सहा खासदार उरले – नावासहित यादी

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार राज्यात निवडून आले होते. त्यावेळी एनडीएत असलेल्या शिवसेनेने भाजपासोबत एकत्र निवडणूक लढवली होती. आता शिवसनेचे तब्बल 12 खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. तर द्धव ठाकरेंकडे फक्त 6 खासदार उरले आहेत.

Shivsena MP: उद्धव ठाकरेंना खूप मोठा झटका! शिवसनेचे तब्बल 12 खासदार शिंदे गटात सामील; आता फक्त सहा खासदार उरले - नावासहित यादी
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 18, 2022 | 9:26 PM

मुंबई : एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडानमुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर महाराष्ट्रात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेला एकपाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. शिंदे गटाला मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवसनेचे तब्बल 12 खासदार(Shivsena MP) शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरेंकडे फक्त 6 खासदार उरले आहेत.

शिंदे गटात सामील झालेल्या खासदारांची यादी

  1. हेमंत गोडसे – शिवसेना
  2. राजेंद्र गावित – पालघर
  3. धैर्यशील माने – हातकणंगले
  4. संजय मंडलिक – कोल्हापूर
  5. सदाशीव लोखंडे – शिर्डी
  6. भावना गवळी- यवतमाळ-वाशिम
  7. राहुल शेवाळे – मुंबई दक्षिण मध्य
  8. श्रीरंग बारणे – मावळ
  9. श्रीकांत शिंदे – कल्याण
  10. प्रतापराव जाधव – बुलढाणा
  11. कृपाल तुमाने – रामटेक
  12. हेमंत पाटील – हिंगोली

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार राज्यात निवडून आले होते. त्यावेळी एनडीएत असलेल्या शिवसेनेने भाजपासोबत एकत्र निवडणूक लढवली होती. आता शिवसनेचे तब्बल 12 खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. तर द्धव ठाकरेंकडे फक्त 6 खासदार उरले आहेत.

उद्धव ठाकरेंकडे उरलेल्या सहा खासदारांची यादी

  1.  संजय जाधव – परभणी
  2. राजन विचारे – ठाणे
  3. गजानन किर्तिकर – मुंबई उत्तर पश्चिम
  4. अरविंद सावंत – मुंबई मध्य
  5. ओमराजे निंबाळकर – उस्मानाबाद
  6. विनायक राऊत – रत्नागिरी

शिंदे गटाला मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आमदारांपाठोपाठ नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोबिंवली, अंबरनाथ, उल्हासनगर, मीरा भाईंदर येथील अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानंतर आता शिवसेनेच्या 14 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. यामुळे शिंदे गटाकडे  शिवसेना पदाधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे.