Assembly Election Final Results 2026 and Winners LIVE : ममता बॅनर्जींचा पराभव करणे गरजेचे होते – सुवेंदू अधिकारी
5 State Assembly Election Results 2026 and Winners LIVE Updates in Marathi : पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झालीये. काही वेळातच चित्र स्पष्ट होईल.

5 State Assembly Election Results 2026 and Winners LIVE Updates in Marathi: पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालाला सुरूवात झाली. यासोबतच बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचाही निकाल आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली, सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक लढली आहे. राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याही निधनानंतर राहुरीची विधानसभेचे जागा रिक्त झाली. त्यांच्या मुलगा अक्षय कर्डिले यांनी ही पोटनिवडणूक लढवली. राज्यातील या दोन विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकालाला सुरूवात झालीये. पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जी यांची सत्ता आहे. भाजपाकडून पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्याकरिता मोठे प्रयत्न झाले. निकालाला सुरूवात झाली. काही वेळातच चित्र स्पष्ट होईल. आराममध्ये भाजपा वरचढ ठरतान दिसत आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
ममता बॅनर्जींचा पराभव करणे गरजेचे होते – सुवेंदू अधिकारी
भवानीपूरमध्ये विजय मिळवल्यानंतर सुवेंदू अधिकारी म्हणाले, “ममता बॅनर्जींचा पराभव करणे गरजेचे होते. हा ममता बॅनर्जींचा राजकारणाला निरोप आहे. यावेळीही त्या 15000 हून अधिक मतांनी हरल्या. मुस्लिमांनी त्यांना उघडपणे मतदान केले. वॉर्ड क्रमांक 77 मध्ये मतदानासाठी बाहेर पडलेल्या सर्व मुस्लिमांनी ममता यांनाच मतदान केले. त्याचबरोबर, हिंदू, शीख, जैन आणि बौद्धांनी मला आशीर्वाद देऊन विजयी केले. हा विजय हिंदुत्वाचा विजय आहे.”
-
भ्रष्टाचार करणाऱ्यांचा पराभव झाला – सुवेंदू अधिकारी
भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले. ते म्हणाले की, भ्रष्टाचाराचा पराभव झाला आहे. सुवेंदू अधिकारी यांना ७३,४६३ मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना ५८,३४९ मते मिळाली. अशाप्रकारे, अधिकारी यांनी बॅनर्जी यांचा १५,११४ मतांनी पराभव केला.
-
-
भाजपच्या विजयाचा इचलकरंजीत जल्लोष; कार्यकर्त्यांकडून साखर वाटप
पश्चिम बंगाल, आसाम तसेच पोंडेचेरी येथे भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळा परिसरात साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
-
पश्चिम बंगालमधील यशानंतर सिंधुदुर्गात भाजपचा जल्लोष
देशात झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश संपादन केल्याच्या पार्श्वभूमीवर व पश्चिम बंगालच्या विजयानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार फटाके लावून आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. कुडाळ शहरातील भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, खासदार विनोद तावडे आणि पश्चिम बंगाल भाजप संघटन प्रमुख सतीश धोंड यांचे आभार मानले.
-
सर्वात मोठी बातमी! ममता बॅनर्जींचा भवानीपूरमधून पराभव
बंगालमधील भवानीपूर मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा पराभव झाला आहे. भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी या मतदारसंघातून शानदार विजय मिळवला आहे.
-
भवानीपूर : 17 व्या फेरीअखेर सुवेंदू अधिकारी 6000 मतांनी आघाडीवर
बंगालमधील भवानीपूर मतदारसंघात मतमोजणीची 17 वी फेरी पार पडली आहे. आतापर्यंत सुवेंदू अधिकारी यांना 60500 मते मिळाली आहेत, तर ममता बॅनर्जी यांना 54,265 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे, सुवेंदू अधिकारी यांनी 6235 मतांची आघाडी घेतली आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या विजयाचा जल्लोष
देशात पाच राज्यात निवडणूका पार पडल्या आणि पाच पैकी तीन राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाले, त्याचाच आनंद साजरा करण्यासाठी भाजपच्या वतीने क्रांती चौकात जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. यावेळी मंत्री अतुल सावे, भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. यावेळी पेढे आणि झाल मुरी म्हणजे भेळ वाटत जल्लोष करण्यात येत आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतात सर्वत्र केसरिया सरकार स्थापन झालंय- प्रसाद लाड
भाजपला पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळाला आहे. यावर आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतात सर्वत्र केसरिया सरकार स्थापन झालं आहे. जे सहा राज्य बाकी आहेत तिथेही लवकरच भाजपचं सरकार येणार आहे, पंजाबमध्येही भाजपचं सरकार येईल, असं प्रसार लाड यांनी म्हटलं आहे.
-
आजच्या भारताला विकास करणारे राजकारण हवे आहे
सध्या भारताच्या राजकारणात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. सध्या देशात एकाही राज्यात कम्युनिस्ट पक्षांचे सरकार नाही. हा विचारांत झालेला बदल आहे. आजच्या भारताला विकास करणारे राजकारण हवे आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.
-
पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पश्चिम बंगालमध्ये आयुष्मान भारत योजना लागू करू- मोदींची घोषणा
या निवडणुकीत भारताची लोकशाहीच नव्हे तर देशाच्या संविधानाचादेखील विजय झाला, असे यावेळी मोदी म्हणाले. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी मोठी घोषणा केली. आम्ही आता पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पश्चिम बंगालमध्ये आयुष्मान भारत योजना लागू करू, असे मोदी यांनी जाहीर केले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले पश्चिम बंगाल, आसामच्या जनतेचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरीच्या जनतेचे आभार मानले आहेत. सोबतच त्यांनी भापजाच्या कार्यकर्त्यांचेही आभार मानले. आता आम्ही विकासासाठी कटिबद्ध आहोत, असेही आश्वासन त्यांनी जनतेला दिले.
-
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विजयाचा धाराशिवमध्ये भाजपाकडून जल्लोष
पश्चिम बंगाल मध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या विजयाचा आनंद उत्सव धाराशिवमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर,भाजपच्या धाराशिव प्रभारी अर्चना पाटील चाकूरकर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि मिठाई वाटून जल्लोष केला.
-
संभाजीनगरातील क्रांती चौकात भाजपाचा विजय साजरा
देशात पाच राज्यात निवडणूका पार पडल्या आणि पाच पैकी तीन राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाले, त्याचाच आनंद साजरा करण्यासाठी भाजपच्या वतीने क्रांती चौकात जोरदार जल्लोष करण्यात येत आहे. यावेळी मंत्री अतुल सावे, भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. यावेळी पेढे आणि झालमुरी म्हणजे भेळ वाटत जल्लोष करण्यात येत आहे.
-
पश्चिम बंगालमधल्या विजयाबद्दल भाजपाचे अभिनंदन – जयंत पाटील
पश्चिम बंगाल मध्ये भाजपाने प्रचंड मेहनत घेऊन विजय मिळवला आहे,या विजयाबद्दल त्यांचे प्रथमदर्शनी अभिनंदन केले पाहिजे,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे, विजयानंतर या गोष्टीचा विश्लेषण होईल, विवेचन होईल त्यानंतर त्याच्यावर अधिक बोलता येईल,असे देखील ते म्हणाले आहे.
-
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा नवा विक्रम
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा नवा विक्रम. 2019 मधील दादांच्या मताधिक्यापेक्षा सुनेत्रा पवारांना जास्त मतदान. सुनेत्रा पवारांचा 2 लाख 18 हजार मतांनी बारामातीत विजय. बारामतीकरांनी दादांमुळे माझ्यावर विश्वास ठेऊन मतदान केलं-सुनेत्रा पवार. तर राहुरीत भाजपच्या अक्षय कर्डीलेंचा विजय, पवारांच्या राष्टवादीचा पराभव
-
15व्या फेरीनंतर भवानीपूरमधील मतमोजणी थांबवली
15व्या फेरीनंतर भवानीपूरमधील मतमोजणी थांबवली. ममता बॅनर्जीही भवानीपूर मतमोजणी केंद्रावर. शुभेंदू अधिकारीही मतमोजणी केंद्रावर आहेत. पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ
-
पश्चिम बंगाल जिंकण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण…
पश्चिम बंगाल जिंकण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण… तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपचा ऐतिहासिक विजय… इतिहासात पहिल्यांदाच बंगालमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार… पश्चिम बंगालमध्ये भाजपचा 192 जागांवर दणदणीत विजय तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 95 जागा.. काँग्रेससह इतरांना केवळ 6 जागा…
-
5 राज्यांचे निकाल लागले असून 3 राज्यांमध्ये सत्तापालट झालं
5 राज्यांचे निकाल लागले असून 3 राज्यांमध्ये सत्तापालट झालं. पश्चिम बंगालसह तामिळनाडू आणि केरळममध्ये सत्तांतर. भाजप पहिल्यांदाच बंगालमध्ये सत्ता स्थापन करणार.. केरळममध्ये काँग्रेसच्या हाती सत्ता तर तामिळनाडूमध्ये थलापती विजयची TVK सत्तेत…
-
पश्चिम बंगालमध्ये मोठा गोंधळ, मतमोजणी रोखली..
पश्चिम बंगालचे निकाल पुढे येत आहेत. ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसल्याचे या निकालात दिसत आहे. आता भवानीपूरमधील मतमोजणी थांबण्यात आलीये.
-
पश्चिम बंगालच्या विजयावर देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया..
पश्चिम बंगालसह 3 राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आलीये. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम बंगालच्या विजयावर मोठे विधान केले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ममता बॅनर्जी यांच्या काळात आर्थिक विकास रखडला.
-
भवानीपूर मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ, मतमोजणी थांबवली..
पश्चिम बंगाल विधानसभेची मतमोजणी सुरू आहे. यादरम्यान भवानीपूर मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ झालाय. ममता बॅनर्जी स्वत: मतमोजणी केंद्रावर पोहोचल्या आहेत. मोठ्या गोंधळानंतर भवानीपूर मतमोजणी केंद्रात मतमोजणी थांबलीये..
-
West Bengal Election Results 2026 : भाजपाच्या विजयावर स्मृती ईराणी यांचे मोठे विधान..
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाली आहेत. मोठा धक्का ममता बॅनर्जी यांना बसला. यादरम्यान बोलताना भाजपाच्या नेत्या स्मृती ईराणी यांनी म्हटले की, ममता बॅनर्जी यांना लोकशाहीवर विश्वास नव्हता.
-
West Bengal Election Results 2026 : भवानीपूर मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ, ममता बॅनर्जी थेट खासगी..
भवानीपूर मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालाय. ममता बनर्जी खासगी सुरक्षारक्षक घेऊन थेट मतमोजणी केंद्रावर पोहोचल्या आहेत. भवानीपूर मतमोजणी केंद्रावर खासगी सुरक्षारक्षक बघायला मिळत आहेत. भाजपाचे उमेदवार अधिकारी दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर ममता बॅनर्जी आघाडीवर आहेत.
-
West Bengal Election Results 2026 : भवानीपूर मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ, ममता बॅनर्जी थेट खासगी..
भवानीपूर मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालाय. ममता बनर्जी खासगी सुरक्षारक्षक घेऊन थेट मतमोजणी केंद्रावर पोहोचल्या आहेत. भवानीपूर मतमोजणी केंद्रावर खासगी सुरक्षारक्षक बघायला मिळत आहेत.
-
West Bengal Election Results 2026 : मतमोजणी केंद्रावर थेट ममता बनर्जी..
मतमोजणी केंद्रावर ममता बनर्जी पोहोचल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाले. भाजपाने जोरदार मुसंडी मारलीये.
-
निवडणूक आयोगावर ममता बनर्जी यांचा गंभीर आरोप…
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल पुढे येत आहे. यादरम्यानच ममता बनर्जी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोग आपली मनमानी करत असल्याचे त्यांनी म्हटले.
-
West Bengal Election Results 2026 : पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा मोठा इतिहास..
पश्चिम बंगालमध्ये भाजपाने मोठा इतिहास रचल्याचे बघायला मिळत आहे. भाजपाने जोरदार कामगिरी केली. 192 जागांवर भाजपा आघाडीवर आहे.
-
केरळममध्ये कॉंग्रेसला बहुमत.. तब्बल 102…
केरळममध्ये कॉंग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. 102 सीटवर आघाडीवर आहे. हे कॉंग्रेसचे अत्यंत मोठे यश म्हणावे लागणार आहे.
-
West Bengal Election Results 2026 : ममता बनर्जी यांच्या घराबाहेर बीजेपी कार्यकर्ते..
ममता बनर्जीच्या घरी पोहोचले बीजेपी कार्यकर्ते. बीजेपी कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी ममता बनर्जी यांच्या घराबाहेर केली. पोलिसांनी ममता बनर्जी यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली आहे.
-
Assembly Election Results 2026 : थलापती विजयचा जलवा, पहिल्याच..
तामिळनाडूमध्ये मोठा बदल झाला. थेट विजय थलापती याच्या पक्षाला मोठे यश मिळाले. नव्यानवख्या पक्षाला मोठे यश मिळाल्याचे बघायला मिळतंय. डीएमकेला झटका बसलाय.
-
West Bengal Election Results 2026 : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष बघायला मिळत आहे. भाजपा कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. बंगालच्या विजयानंतर लाडक्या बहिणींनी अश्रू अनावर झालेत.
-
West Bengal Election Results 2026 : ममता बनर्जी यांना मोठा दणका, थेट..
ममता बनर्जी यांच्या मंत्र्यांना दणका.. पश्चिम बंगालचे निकाल पुढे येत आहेत. या निवडणुकीत ममत बनर्जी यांच्यासह त्यांच्या मंत्र्यांना जोरदार दणका बसल्याचे बघायला मिळत आहे. ममता बनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील जवळपास मंत्री पिछाडीवर आहेत.
-
Assam Election Results 2026 : आसाममध्ये भाजपाची विजयाकडे वाटचाल..
आसाम विधानसभेचा निकाल पुढे येत आहे. भाजपाने जोरदार मुसंडी या निकालात मारली आहे. सुरूवातीपासूनच भाजपा आघाडीवर होती. आता भाजपाची विजयाकडे वाटचाल बघायला मिळत आहे.
-
पश्चिम बंगालमध्ये बदलले आकडे, थेट 95 टीएमसी, भाजपा 192 वर आघाडीवर…
95 टीएमसी, भाजपा 192 वर आघाडीवर. पश्चिम बंगाल विधानसभेचे निकाल पुढे येत आहेत. मात्र, धक्कादायक आकडे बघायला मिळत आहेत. ममता बनर्जी यांच्याविरोधातील रोष लोकांनी व्यक्त केल्याचे भाजपाकडून सांगितले जात आहे.
-
आसनसोलमध्ये मोठा राडा, थेट भाजपा कार्यकर्त्यांकडून..
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल पुढे येत आहे. भाजपा जोरदार मुसंडी मारत आहे. आसनसोलमध्ये भाजपा आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झालाय.
-
West Bengal Election Results 2026 : पश्चिम बंगालमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी…
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे आकडे सतत बदलताना दिसत आहेत. आता नुकताच आलेल्या कलांनुसार, टीएमसी 93 तर भाजपा 196 जागांवर आघाडीवर आहे.
-
West Bengal Election Results 2026 : ममता बनर्जी यांच्या घराची सुरक्षा वाढवली..
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. हा निकाल भाजपाच्या बाजूने लागताना दिसत आहे. आता पोलिसांकडून ममता बनर्जी यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली.
-
Assembly Election Results 2026 : आसाममध्ये भाजपाची बहुमताकडे वाटचाल..
आसाम विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास हाती आलाय. आसाममध्ये भाजपाची जोरदार कामगिरी राहिली. भाजपा बहुमताकडे जवळपास वाटचाल करत आहे.
-
Assembly Election Results 2026 : मोठी बातमी! 5 राज्यांपैकी 3 राज्यात भाजपाची एकहाती सत्ता, थेट..
देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. यामध्येच भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याचे बघायला मिळत आहे. 5 पैकी 3 राज्यात भाजपाची एकहाती सत्ता बघायला मिळत आहे.
-
West Bengal Election Results 2026 : तृणमूल कॉंग्रेसचे कार्यालयाला मोठी आग, गंभीर आरोप..
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. तृणमूल कॉंग्रेसच्या आसनसोलमधील कार्यालयाला मोठी आग लागली. ही आग भाजपा कार्यकर्त्यांनी लावल्याचा आरोप करण्यात आला.
-
Assembly Election Results 2026 : शेवटच्या फेरीपर्यंत विजय आमचाच होईल, ममता बनर्जी यांचा मोठा दावा..
शेवटच्या फेरीपर्यंत विजय आमचाच होईल, ममता बनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान अत्यंत मोठा दावा केला. सतत आकडे बदलत आहेत. टीएमसी 95 तर भाजपा 194 वर आहे. भाजपा मुसंडी मारताना दिसत आहे.
-
West Bengal Election Results 2026 : पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जी यांचा दावा खरा..
पश्चिम बंगालमध्ये मोठे वारे बदलल्याचे बघायल मिळत आहे. ममता बनर्जी यांच्या दाव्याप्रमाणे टीएमसीच्या सीटमध्ये मोठी आघाडी बघायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये आकडे बदलताना दिसत आहे. भाजपाच्या सीट काही वेळापेक्षा आता कमी झाल्यात
-
West Bengal Election Results 2026 : पश्चिम बंगालमध्ये वारे बदलले, ममता बनर्जीचा दाव्यानंतर आकडे बदलले…
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. आता वारे बदलल्याचे बघायला मिळत आहे. थेट टीएमसीच्या सीटमध्ये वाढ झाली. 121 टीएमसी आघाडीवर आहे. 156 वर भाजपा आघाडीवर आहे. सुरूवातीला भाजपा 187 वर होते..
-
कोलकत्तामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून ममता बनर्जीची नक्कल..
कोलकत्तामध्ये स्थिती वेगळी बघायला मिळत आहे. भाजपा कार्यकर्ते आक्रमक झालीत. ममता बनर्जी यांची नक्कल भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
-
West Bengal Election Results 2026 : आसनसोल, बाकुंडामध्ये मोठा राडा…
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. पश्चिम बंगालचा निकाल पुढे येताच काही ठिकाणी हिंसाचार झाला. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
-
West Bengal Election Results 2026 : ममता बनर्जी यांच्या मंत्र्यांना धक्का..
पश्चिम बंगाल विधानसभेचे निकाल पुढे येत आहेत. या निकालात ममता बनर्जी यांना धक्का बसलाय. धक्कादायक बाब म्हणजे ममता बनर्जी यांच्या मंत्री मंडळातील मंत्री पिछाडीवर आहेत..
-
West Bengal Election Results 2026 : ममता बनर्जी यांच्या घराबाहेर भाजपा कार्यकर्ते, थेट..
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. भाजपाने मोठी मसुंडी या निकालात मारली आहे. यादरम्यानच आता भाजपाचे कार्यकर्ते ममता बनर्जी यांच्या घराबाहेर पोहोचले आहेत. जय श्रीरामचे नारे भाजपा कार्यकर्त्यांकडून दिली जात आहेत.
-
West Bengal Election Results 2026 : ममता बनर्जी यांचा भाजपाची झोप उडवणारा दावा..
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल पुढे येत आहे. या निकालावर बोलताना ममता बनर्जी यांनी म्हटले की, 12 वाजल्यानंतरच्या निकालात आम्ही जिंकणार आहोत.
-
West Bengal Election Results 2026 : ममता बनर्जी यांनी वाढवले भाजपाचे टेन्शन, थेट मोठा दावा..
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. यादरम्यानच ममता बनर्जी यांनी दावा केला की, हे निकाल पहिल्या फेऱ्यांचे आहेत. अजून खूप फेऱ्या शिल्लक आहेत. ममता बनर्जी यांच्या या विधानाने भाजपाचे टेन्शन वाढले आहे.
-
Assembly Election Results 2026 : खेळ पलटणार ममत बनर्जी यांचा थेट मोठा दावा…
ममता बनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मोठी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, हे निकाल पहिल्या दोन ते तीन फेऱ्यांचे आहेत. निकाल लवकरच पलटतील..
-
Mamata Banerjee first reaction on the assembly elections : निकालावर ममता बनर्जी यांची मोठी प्रतिक्रिया..
पश्चिम बंगालचे निकाल हाती येत आहेत. टीएमसी 100 तर भाजपा 186 वर आघाडीवर आहेत. यादरम्यान ममता बनर्जी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. ममता बनर्जी यांनी म्हटले की, पहिल्या दोन तीन फेऱ्यांचे हे निकाल आहेत.
-
West Bengal Election Results 2026 : पश्चिम बंगालमध्ये पोलिसांच्या लाठीचार्ज, मोठा हंगामा..
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा झालाय. पोलिसांनी लाठीचार्ज केला. मतदान केंद्राबाहेर पोलिसांकडून लाठीचार्ज केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणलीये..
-
कोलकाता भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष..
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांकडून जोरदार सेलिब्रेशन केले जात आहे.
-
West Bengal Election Results 2026 : पश्चिम बंगालमध्ये वारे फिरले, धक्कादायक आकडे हाती..
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे कल हाती येत आहेत. सध्याच्या घडीच्या कलांनुसार, टीएमसी 100 , भाजपा 186 आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये जोरदार वारे फिरल्याचे बघायला मिळत आहे.
-
West Bengal Election Results 2026 : महिला विधेयकाला विरोध करणे मुळावर..
संसदेत महिला बिलाला विरोध करणे ममता बनर्जी यांच्या मुळावर आल्याचे बघायला मिळत आहे. त्यांनी या बिलाला विरोध केला होता.
-
West Bengal Election Results 2026 : 101 टीएमसी तर 185 भाजपा पश्चिम बंगालमध्ये वारे फिरले..
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पुढे येत आहे. धक्कादायक निकाल पुढे येत आहे. त्यामध्येच आता 101 टीएमसी तर 185 भाजपा आघाडीवर आहे.
-
दिल्ली मुख्यालयात आज सायंकाळी जल्लोष…
दिल्ली मुख्यालयात आज सायंकाळी जल्लोष होणार आहे. पश्चिम बंगाल आणि आसामच्या विजयानंतर या जल्लोषाचे आयोजन होणार आहे..
#WATCH | Delhi: Poori and sweets being prepared at the BJP Headquarters in Delhi as counting of votes for the elections to the Assemblies of Assam, Keralam, Tamil Nadu, West Bengal and Puducherry will begin shortly.
Counting of votes for by-polls in seven Assembly… pic.twitter.com/UKdgMXc1rW
— ANI (@ANI) May 4, 2026
-
West Bengal Election Results 2026 : ममता बनर्जी यांना विधानसभेच्या निकाला मोठा झटका..
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. या निकालाने ममता बनर्जी यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे. टीएमसी 101 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा 184 जागांवर आघाडीवर आहे.
-
West Bengal Election Results 2026 : या अभिनेत्याची जादू थेट फिरवला विधानसभा निडणुकीचा निकाल, धक्कादायक आकडे..
तामिळनाडू विधानसभेचा निकाल पुढे येत आहे. डीएमकेला अत्यंत मोठा झटका या निवडणुकीत बसल्याचे बघायला मिळत आहे. थेट विजय थलापती याने हा निकाल फिरवला. विजयच्या पार्टीने धमाकेदार कामगिरी केली. यादरम्यान विजय थलापती याच्या घरातील सेलिब्रेशनचा व्हिडीओही व्हायरल झाला.
-
ममता बनर्जींना भवानीपूरमध्ये झटका..
पश्चिम बंगाल विधानसभेचे निकाल पुढे येत आहेत. या निकालांमध्ये ममता बनर्जी यांना मोठा दणका बसताना दिसत आहे. थेट भवानीपूरमध्ये त्या पिछाडीवर दिसत आहेत.
-
Bengal Election Result 2026 : लाडक्या बहिणींनी भाजपाचा पश्चिम बंगालमध्ये भाजपाला सपोर्ट..
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. या निकालानुसार, भाजपाला स्पष्ट बहुमत पश्चिम बंगालमध्ये मिळत आहे. टीएमसी 111 सीटवर आघाडीवर आहे तर भाजपा 175 सीटवर आघाडीवर आहे.
-
पश्चिम बंगालमध्ये हिंदूंनी शिकवला धडा- सुवेंदु अधिकारी
पश्चिम बंगालमध्ये जोरदार कामगिरी भाजपाची रााहिली आहे. सुरूवातीच्या कलांनुसार, भाजपाला स्पष्ट बहुमत आहे. याबाबत बोलताना सुवेंदु अधिकारी यांनी म्हटले की, पश्चिम बंगालमध्ये हिंदूंनी धडा शिकवला आहे.
-
West Bengal Election Results 2026 : कलांमध्ये भाजपाला बहुमत, थेट ममता बनर्जींना..
सध्याच्या कलांनुसार, भाजपाला स्पष्ट बहुमत या निवडणुकीत मिळाल्याचे बघायला मिळत आहे. धमाकेदार कामगिरी या निवडणुकीत भाजपाची राहिली आहे..
-
Bengal Election Results 2026 : पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जींना थेट मोठा झटका
पश्चिम बंगालच्या निकालाकडे राज्याच्या नजरा आहेत. धक्कादायक निकाल पुढे येत आहेत. त्यामध्येच आता ममता बनर्जीही पिछाडीवर आहेत. मोठा फरक भाजपा आणि टीएमसीमध्ये बघायला मिळतोय. टीएमसी 114 सीट तर भाजपा 171 आघाडीवर आहेत.
-
West Bengal Election Results 2026 : भाजपाला बहुमत, कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष सुरू..
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. भाजपा जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. बहुमताच्या जवळ भाजपा पोहोचली आहे.
-
West Bengal Election Results 2026 : पश्चिम बंगालमध्ये वारे फिरले, हैराण करणारे आकडे पुढे..
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे धक्कादायक आकडे पुढे येत आहेत. ममता बनर्जी यांना अत्यंत मोठा धक्का बसलाय. भवानीपूरा येथे ममता बनर्जी मागे पडल्या आहेत. टीएमसी 115 तर भाजपा 168 सीटवर आघाडीवर आहे.
-
Assembly Election Results 2026 : विधानसभा निवडणुकीत या अभिनेत्याने फिरवले वारे, थेट..
तामिळनाडून विधानसभेचे निकाल पुढे येत आहेत. कोणीही विचार केला नाही असे निकाल पुढे येत आहेत. तामिळनाडूमध्ये डीएमकेला धक्का बसलाय. डीएमकेची सत्ता हातून जाताना दिसत आहे. हा मोठा धक्का म्हणावा लागेल.
-
Bengal Election Result 2026 : पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा बहुमताचा आकडा..
पश्चिम बंगाल विधासभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. भाजपाने जोरदार मुसंडी या निकालात मारल्याचे दिसत आहे. सुरूवातीचे आकडे पुढे येत आहेत. भाजपाने 152 बहुमताचा आकडा पार केला. भाजपा 152 आकड्यांवर आहे. तर टीएमसी 121 जागांवर आघाडीवर आहे..
-
Bengal Election Result 2026 : पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जी यांना थेट धक्का..
पश्चिम बंगालमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याचे बघायला मिळत आहे. ममता बनर्जी यांना मोठा धक्का पश्चिम बंगालमध्ये बसत आहे. ममता बनर्जी भवानीपूर येथे पिछाडीवर आहेत.
-
Bengal Election Result 2026 : ममता बनर्जी तब्बल इतक्या मतांनी आघाडीवर, भाजपाला धक्का…
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. सुरूवातीच्या कलांनुसार, भवानीपूरमध्ये भाजपाला धक्का बसताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे भवानीपूरमध्ये ममता बनर्जी तब्बल 2 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत.
-
Tamil Nadu Election Results 2026 : तामिळनाडूमध्ये ज्याचा विचारही कोणी केला नाही असे निकालात घडतंय..
तामिळनाडूमधून धक्कादायक आकडे पुढे येत आहेत. विजय थलापती याच्या नव्या पक्षाला मोठे यश मिळत आहे. डीएमकेची सत्ता हातून जाण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
-
Kerala Election Results 2026 : केरळममध्ये डाव्यांचा अखेरचा गड ढासळला, थेट..
केरळमधून धक्कादायक आकडे पुढे येत आहेत. केरळमध्ये काँग्रेसची सत्ता येताना दिसत आहे. सुरूवातीच्या आकड्यांनुसार, हा मोठा झटका नक्कीच म्हणावा लागेल..
-
Tamil Nadu Vidhan Sabha Election Results 2026 : तामिळनाडूमधून धक्कादायक आकडे, डीएमकेला झटका…
तामिळनाडूमधून धक्कादायक आकडे पुढे येत आहेत. डीएमकेच्या हातून सत्ता जाण्याचे संकेत आहेत. अभिनेता विजय थलापती याच्या नव्यानवख्या पक्षाला मोठे यश मिळत आहे. सुरूवातीच्या कलामध्ये हा मोठा धक्का म्हणावा लागेल.
-
Tamil Nadu Election Results 2026 : तामिळनाडूमध्ये डीएमकेला दणका..
तामिळनाडूमध्ये धक्कादायक निकाल पुढे येत आहेत. डीएमकेला मोठा दणका बसला आहे. डीएमके ऑफिसमध्ये येणाऱ्या आकड्यांनंतर टीव्ही हटवण्यात आला..
-
Tamil Nadu Election Results 2026 : तामिळनाडूमध्ये स्टॅलिनला मोठा धक्का, विजयचा जलवा..
तामिळनाडूमध्ये धक्कादायक निकाल पुढे येत आहेत. स्टॅलिनला मोठा धक्का बसला. अभिनेता विजयचा या निकालात जलवा बघायला मिळथ आहे.
-
भाजपा मोठा धक्का, ममता बनर्जी आघाडीवर..
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत. भाजपाची जोरदार कामगिरी या निवडणुकीत बघायला मिळत आहे. मात्र, भवानीपूरमध्ये भाजपा
-
West Bengal Election Result 2026 : भाजपाला भवानीपूरमध्ये धक्का, थेट ममता बनर्जी..
भवानीपूरमध्ये भाजपाला मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा ममता बनर्जी आघाडीवर आहेत. बाकी राज्यात भाजपाची जोरदार कामगिरी बघायला मिळत आहे.
-
West Bengal Election Results 2026 : पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जी यांना पळता भुई कमी…
पश्चिम बंगालचे निकाल हाती येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जी यांना धक्का बसत आहे. भवानीपूरमध्ये ममता बनर्जी पिछाडीवर आहेत. यासोबतच टीएमसी 119 मध्ये तर भाजपा 123 जागांवर आघाडीवर आहे.
-
West Bengal Election Results 2026 : पश्चिम बंगालमधून धक्कादायक आकडे पुढे, थेट भाजपाने…
पश्चिम बंगालमधून आकडे पुढे येत आहेत. सतत आकडे बदलताना दिसत आहेत. टीएमसी 118 जागांवर आघाडीवर आहे तर भाजपा 124 जागांवर आघाडीवर आहे.
-
Bengal Election Result 2026 : ममता बनर्जींना अत्यंत मोठा धक्का, थेट..
भवानीपूरमधून विधानसभा निवडणुक ममता बनर्जी लढवत आहेत. ममता बनर्जी सुरूवातीला आघाडीवर दिसल्या. मात्र, आजा ममता बनर्जी यांना मोठा धक्का बसलाय. ममता बनर्जी पिछाडीवर गेल्या आहेत.
-
Tamil Nadu Election Results 2026 : तामिळनाडूमधून धक्कादायक आकडे पुढे..
तामिळनाडूमधून धक्कादायक आकडे पुढे येताना दिसत आहेत. तामिळनाडूमध्ये TVR आणि DMK मध्ये जोरदार टक्कर बघायला मिळत आहे. तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयच्या पक्षाची धमाकेदार कामगिरी..
-
Bengal Election Result 2026 : पश्चिम बंगालमध्ये भाजपाची धमाकेदार सुरूवात, पहिले आकडे…
पश्चिम बंगालमध्ये भाजपाची जोरदार कामगिरी सुरू झालीये. टीएमसी 106 जागांवर तर भाजपा 111 जागांवर आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे.
-
Kerala Election Results 2026 : कलांनुसार केरळममध्ये काँग्रेसला बहुमत, येणारे आकडेही..
केरळम विधानसभा निवडणुकीचा निकाल पुढे येत आहेत. काँग्रेसची कामगिरी चांगली ठरत आहे. कलांनुसार, काँग्रेसची सत्ता केरळममध्ये दाखवण्यात आली.
-
Bengal Election Result 2026 : पश्चिम बंगालचे निवडणूक आयोगाचे अपडेट पुढे..
पश्चिम बंगालच्या निकालाकडे जगाच्या नजरा आहेत. निवडणूक आयोगाचे आकडे पुढे येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपा एका जागेवर आघाडीवर असल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून पुढे येत आहे.
-
Bengal Election Result 2026 : भाजपा आणि टीएमसीमध्ये जोरदार टक्कर..
पोस्टल मतमोजणीला सुरूवात झालीये. या मतमोजणीत भाजपा आणि टीएमसीमध्ये जोरदार टक्कर बघायला मिळत आहे. मात्र, भवानीपूरमध्ये ममता बनर्जी आघाडीवर आहेत.
-
West Bengal Election Results 2026 : पश्चिम बंगालमध्ये भाजपाला मोठा झटका..
भवानीपूरमध्ये ममता बनर्जी या निवडणुकीत मैदानात उतरल्या आहेत. या निवडणुकीत ममता बनर्जी या आघाडीवर आहेत. हा भाजपाला अत्यंत मोठा झटका आहे.
-
पश्चिम बंगालमधून धक्कादायक आकडे पुढे..
पश्चिम बंगालमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली आहे. आता आकडे पुढे येताना दिसत आहेत. टीएमसी 105 तर भाजपा 110 जागांवर आघाडीवर आहेत.
-
Assembly Election Results 2026 : भवानीपूरमध्ये ममता बनर्जी आघाडीवर
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मजमोजणीला सुरूवात झालीये. भवानीपूरमध्ये ममता बनर्जी आघाडीवर आहेत. हा भाजपाला मोठा झटका आहे.
-
West Bengal Election Results 2026 : पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि टीएमसीमध्ये जोरदार टक्कर..
पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि टीएमसीमध्ये मोठी आघाडी बघायला मिळत आहे. भाजपा पोस्टल मतमोजणीमध्ये आघाडीवर असल्याचे बघायला मिळत आहे.
-
Assam Election Results 2026 : आसाममध्ये भाजपाची विजयाकडे एकतर्फी वाटचाल
आसाममध्ये भाजपाची विजयाकडे एकतर्फी वाटचाल करत आहे. आसाममध्ये भाजपाने जोरदार कामगिरी केल्याचे बघायला मिळतंय. सुरूवातीपासूनचे आकडेच भाजपाने बाजूने आहेत. सत्तेकडे वाटचाल भाजपाने केलीये.
-
Puducherry Election Results 2026 : पुद्दुचेरीमध्ये भाजपा आघाडीवर मोठा धमका
पुद्दुचेरीमध्ये भाजपाची जबरदस्त कामगिरीने सुरूवात झालीये. पुद्दुचेरीचे निकाल पुढे येत आहेत.
-
पोस्टल मतमोजणीत भाजपचे अक्षय कर्डीले आघाडीवर
8.30 वाजेनंतर EVM मतमोजणीला होणार सुरूवात होईल. सध्या पोस्टल मतमोजणीला सुरूवात झालीये. ज्यामध्ये राहुरीमध्ये पोस्टल मतमोजणीत अक्षय कर्डीले आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय.
-
West Bengal Election Results 2026 ममता बनर्जी यांचा भाजपाला मोठा दणका
पोस्टल मतमोजणीला सुरूवात झालीये. भवानीपूरमध्ये ममता बनर्जी आघाडीवर आहेत. ममता बनर्जी यांनी भाजपाला दणका दिलाय.
-
Assembly Election Results 2026 : बारामती विधानसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार आघाडीवर
बारामती विधानसभेच्या पोस्टल मतमोजणीला सुरूवात झालीये. या पोस्टल मतमोजणीमध्ये सुनेत्रा पवार आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय.
-
West Bengal Election Results 2026 : भवानीपूरमध्ये ममता बनर्जी आघाडीवर
भवानीपूरमध्ये ममता बनर्जी आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय. हा भाजपा अत्यंत मोठा झटका म्हणावा लागणार आहे.
-
Election Results LIVE : पश्चिम बंगालमध्ये भाजपा आघाडीवर..
5 विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरूवात झालीये. सध्या पोस्टल मतमोजणीला सुरूवात झालीये. पोस्टल मतमोजणीमध्ये भाजपा आघाडीवर असल्याचे बघायला मिळतंय.
-
Assembly Results LIVE : आसाममध्ये भाजपा आघाडीवर
आसाममध्ये भाजपा पोस्टल मतमोजणीमध्ये आघाडीवर आहे. भाजपाची सुरूवात चांगली झाल्याचे बघायला मिळत आहे.
-
पोस्टल मतमोजणीला सुरूवात काही वेळातच निकाल हाती..
पोस्टल मतमोजणीला सुरूवात झालीये. काही वेळातच एका मागून एक निकाल हाती येण्यास सुरूवात होईल.
-
पश्चिम बंगालमध्ये कोणाची असणार सत्ता?
पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे देशाच्या नजरा लागल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जी आणि भाजपाने जोर लावला. विधानभा निवडणुकीच्या अगोदरच मोठे बदल ममता बनर्जी यांच्याकडून करण्यात आलीत.
-
Assembly Results LIVE :ममता बनर्जी यांचे कार्यकर्त्यांना मोठे आदेश
टीएमसी कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर लक्ष ठेवावे, असे आदेश ममता बनर्जी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले. त्यांनी याबाबतची सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.