बच्चू कडू मंत्रीपदासाठी प्रचंड आशावादी, कोणतं खातं हवं तेही सांगितलं…

| Updated on: Dec 01, 2022 | 1:31 PM

बच्चू कडूंना मंत्रीपदाची आशा...

बच्चू कडू मंत्रीपदासाठी प्रचंड आशावादी, कोणतं खातं हवं तेही सांगितलं...
बच्चू कडू
Follow us on

पुणे : माजी शालेय शिक्षण मंत्री आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी पुन्हा एकदा आपली मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे. पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद (Ministery) मिळण्याची इच्छा बच्चू कडू यांनी बोलून दाखवली आहे. “पुन्हा मंत्री झालो तर आवडेल. त्यातही दिव्यांग मंत्रालयाचं काम करता आलं तर त्यासारखा आनंद नाही. दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी लढतो. या लढ्याने एक आंदोलनकर्त्याला आमदार आणि मंत्री केलं. त्यामुळे या खात्याचा कारभार मिळाल्यास आनंद होईल, असं बच्चू कडू यांनी बोलून दाखवलं आहे.

मंत्रीमंडळ विस्तार माझ्यासाठी महत्वाचं नाही. दिव्यांग मंत्रालयासमोर विस्तार ही लहान गोष्ट आहे. वंचितांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी सांगतील, असंही बच्चू कडू म्हणालेत.

उद्धव ठाकरेंवर टीका

“किती ही शक्ती एकत्र आल्या तरी जनशक्तीसाठी तुम्ही काय केलं? दिवयांगासाठी आम्ही दहा वेळा गेलो, एकदा ही मीटिंग झाली नाही. लोकांबाबत जर मनात आस्था नसेल अश्या शक्ती एकत्र येऊन काय होणार नाही”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

राऊतांच्या विधानाशी सहमती

भाजपमध्ये छत्रपतींचा अपमान करण्याची स्पर्धा लागलीय, असं संजय राऊत म्हणाले. त्यांच्या या विधानावरही बच्चू कडू बोललेत. संजय राऊत यांचं म्हणणं काही अंशी खरंच आहे. मी त्यांच्या बाजूने आहे. काही लोक आक्षेपार्ह बोलतात.कुठल्याही महापुरुषांबद्दल बोलणे उचित नाही. त्याचा आम्ही निषेध करतो, असंही बच्चू कडू म्हणालेत.