छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीत बीडमध्ये सामूहिक विवाह सोहळा, 25 जणांवर गुन्हा

| Updated on: Feb 22, 2021 | 11:38 AM

बीडमध्ये सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणे आयोजकांच्या अंगलट आलं आहे (Beed Collective Marriage Ceremony). याप्रकरणी आयोजकासह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीत बीडमध्ये सामूहिक विवाह सोहळा, 25 जणांवर गुन्हा
Chhatrapati SambhajiRaje
Follow us on

बीड : बीडमध्ये सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणे आयोजकांच्या अंगलट आलं आहे (Beed Collective Marriage Ceremony). याप्रकरणी आयोजकासह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. इतकंच नाही तर या विवाह सोहळ्याला आमदार, खासदाराची उपस्थिती होती. विवाह सोहळ्यात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. याप्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Beed Collective Marriage Ceremony).

नेमकं प्रकरण काय?

एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट घोंगावत असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे सामूहिक विवाह सोहळ्यात हजारोंची गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhajiraje), राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार प्रकाश सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

Beed Collective Marriage Ceremony

या विवाह सोहळ्यात मास्क सोशल डिस्टन्सचा अक्षरशः फज्जा उडाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने या सामुदायिक विवाह सोहळ्याला परवानगी नाकारली असताना मिरवणूक आणि विवाहसोहळ्याला गर्दी जमा विधाने 25 जणांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायला पाहिजे होते. मात्र, या ठिकाणी बैठक व्यवस्थेमध्ये बसलेल्या महिला एकत्रित बसलेल्या दिसत आहेत. प्रत्येकाने आपापले मास्क लावावे, अशा सूचना देखील छत्रपती संभाजीराजे यांनी या कार्यक्रमाच्या वेळी मनोगत व्यक्त करताना केलेल्या. प्रत्येकाने काळजी घ्यावी, असं देखील संभाजीराजे भोसले यांनी सांगितलं. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असताना मास्क न वापरणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती.

Beed Collective Marriage Ceremony

संबंधित बातम्या :

कोरोनाचा कहर, शेगावचं गजानन मंदिर भाविकांसाठी बंद, प्रशासन अलर्ट मोडवर!

हॉटेलमध्ये 21 कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं महापालिकेला जाग; अँटिजेन टेस्ट आणि RTPCR तपासणीला वेग