जिल्हाभरात आघाडी, पण परळीने पुन्हा एकदा प्रीतम मुंडेंची साथ सोडली

| Updated on: May 23, 2019 | 10:19 AM

बीड : लोकसभा निकालाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय. महाराष्ट्रातही भाजप आणि शिवसेनेचीच आघाडी आहे. दुसरीकडे बीडमध्ये भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली. पण परळी शहरातून त्यांना आघाडी मिळू शकली नाही. परळी शहरातून प्रीतम मुंडे एक हजार मतांनी पिछाडीवर होत्या. इतर तालुक्यांमध्ये प्रीतम मुंडे आघाडीवर आहेत. सहाव्या फेरीअखेर प्रीतम […]

जिल्हाभरात आघाडी, पण परळीने पुन्हा एकदा प्रीतम मुंडेंची साथ सोडली
पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे
Follow us on

बीड : लोकसभा निकालाच्या सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय. महाराष्ट्रातही भाजप आणि शिवसेनेचीच आघाडी आहे. दुसरीकडे बीडमध्ये भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली. पण परळी शहरातून त्यांना आघाडी मिळू शकली नाही. परळी शहरातून प्रीतम मुंडे एक हजार मतांनी पिछाडीवर होत्या. इतर तालुक्यांमध्ये प्रीतम मुंडे आघाडीवर आहेत. सहाव्या फेरीअखेर प्रीतम मुंडेंना 34243 मतांची आघाडी मिळाली होती.

परळी शहराने कायमच राष्ट्रवादीला साथ दिली आहे. या निवडणुकीतही हाच ट्रेंड दिसून येतोय. परळी नगरपरिषदेची निवडणूक असो किंवा विधानसभा आणि लोकसभा, परळी शहरात मात्र भाजपला मताधिक्य मिळत नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी जिल्हाभरात मुसंडी मारलेली असताना परळी शहरातून मात्र पिछाडीवर होते. परळी ग्रामीण भागात मात्र पालकमंत्री पंकजा मुंडे यांचंच वर्चस्व कायम दिसतंय. अजून पुढील काही फेऱ्यांमध्ये चित्र स्पष्ट होईल.

बीडमध्ये प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांची थेट लढत आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीकडे राज्याचं लक्ष आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये प्रीतम मुंडेंनी जवळपास 30 हजार मतांची आघाडी घेतली होती. देशातील सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम प्रीतम मुंडे यांच्या नावावर आहे. पण या निवडणुकीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली. ही लढत किती अटीतटीची झाली हे अंतिम निकालानंतरच स्पष्ट होईल.

अंतिम निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार

व्हीव्हीपॅट मोजणीमुळे विविध मतदारसंघांमध्ये अंतिम निकाल येण्यासाठी विलंब होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील बीडचा निकाल सर्वात उशिरा येणार आहे. इथे एकूण 36 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे चार ईव्हीएम मशीन लावण्यात आल्या होत्या. त्याची मतमोजणी करण्यासाठी विलंब होणार आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीचा निकाल पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.