नेत्यांच्या पक्षांतरांसाठी भाजपकडून ईडी आणि सीबीआयचा वापर : शरद पवार

| Updated on: Jul 28, 2019 | 4:56 PM

नेत्यांना पक्षांतर करण्यासाठी ईडी आणि सीबीआयची धमकी दिली जात आहे. असे वक्त्व्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील एका पत्रकार परिषदेत केले.

नेत्यांच्या पक्षांतरांसाठी भाजपकडून ईडी आणि सीबीआयचा वापर : शरद पवार
Follow us on

पुणे : “विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर वाढत आहे. त्यातच काही जण नेत्यांना फोडण्याचे काम करत आहे. विशेष म्हणजे नेत्यांना पक्षांतर करण्यासाठी ईडी आणि सीबीआयची धमकी दिली जात आहे. अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत केली.” पुण्यात आज (28 जुलैा) आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी याबाबत वक्तव्य केले.

लोकसभा निवडणुकांनतर आता विधानसभा निवडणुकीतही इनकमिंग-आऊटगोईंग सुरु झाले आहे. काही दिवसांपूर्वी सचिन अहिर, चित्रा वाघ यासारख्या अनेकांनी राष्ट्वादी नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्या सर्वांवरही शरद पवार यांनी वक्तव्य केले.

पक्षांतर करण्यासाठी राजकीय सत्तेचा गैरवापर

निवडणुका आल्या की सर्वच पक्ष तयारीला लागतात. त्यानुसार विविध पक्षातील नेते या ठिकाणाहून त्या ठिकाणी जात आहेत. पण त्या नेत्यांना पक्षांतर करण्यासाठी भाग पाडलं जात आहे. त्यांना ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांचा वापर करत धमकावलं जात आहे. तसेच  लोकप्रतिनिधीवर दडपण आणून राजकीय सत्तेचा गैरवापर केला जातोय अशी टीकाही शरद पवारांनी राज्य सरकारवर केली आहे.

तसेच “पक्षांतरसंदर्भात काही कायदा असताना मात्र त्याला हरताळ फासले जात आहेत. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांनीही या कामाला सध्या वाहून घेतलं आहे. तसेच राष्ट्रवादीबाबत उगीचच काही गैरसमज परसवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.”

नवऱ्यावरील केसच्या दबावमुळे चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी सोडली

विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांचे नाव घेत त्यांनी पक्ष का सोडला याचे स्पष्टीकरणही पवार यांनी दिले. माझ्या पतीवर केस केली आहे. तसेच माझ्याही काही केसेस एसीबीकडे पाठवल्या आहेत. म्हणून मला नाईलाजाने बाहेर पडावं लागतंय असे खुद्द चित्रा वाघ यांनी मला भेटून सांगितलं असा दावाही ही शरद पवार यांनी केला.

“राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांवर खटला भरून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, हे कितपत योग्य आहे असाही सवाल पवार यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची रेड पडली, मात्र हातात काहीच लागलं नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.”

मनसेबाबत अद्याप निर्णय नाही

काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते मला मुंबईत भेटले होते. मात्र त्याबाबत अजून निर्णय झाला नाही. त्यांनी ईव्हीएममुळे निडणुकांवर बहिष्कार टाका अशी मागणीही मनसे नेत्यांनी केल्याचे शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.

धमकवण्यासाठी राज्य सहकारी बँकांचाही वापर

“तसेच पक्ष सोडण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना धमकवले जात आहे. धमकी देण्यासाठी राज्य बँकेचाही वापर केला जात असल्याचेही खळबळजनक वक्तव्य पवार यांनी केले. तसेच संस्थाचालकावर दबाव आणून पक्षांतर करण्यास भाग पाडले जात आहे. विशेष म्हणजे सत्तेचा इतका टोकाचा गैरवापर होताना आतापर्यंत मी पाहिलेला नाही असेही ते यावेळी म्हणाले.”

नवीन पिढीला घेऊन काम करणार 

पक्षांतर होणे किंवा पक्षातील आमदार खासदार यांचे इनकमिंग आऊटगोईंग हे माझ्यासाठी नवीन नाही. काही वर्षांपूर्वी मी 70 वरुन 6 आमदारांवर आलो होतो अशी परिस्थिती होती. त्यामुळे अशा परिस्थिती खचून न जाता नव्या पिढीला सोबत घेऊन काम करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.