आधी कोरोना संकटाकडे लक्ष द्या, बालिश आरोप बंद करा; चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारला सल्ला

| Updated on: Apr 18, 2021 | 3:34 PM

तर सामान्य लोकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.  (Chandrakant Patil comment Nawab Malik)

आधी कोरोना संकटाकडे लक्ष द्या, बालिश आरोप बंद करा; चंद्रकांत पाटलांचा आघाडी सरकारला सल्ला
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावे लागत आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारने आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावे. त्यामुळे सातत्याने केंद्र सरकारवर बालिश आरोप करणं बंद करावे, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री नवाब मलिक यांना दिला. (Chandrakant Patil comment on nawab Malik Statement)

तर सामान्य लोकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही

आपले अपयश लपविण्यासाठी सतत केंद्र सरकारवर आरोप करायचे. त्यात वाद निर्माण करुन कोरोनाच्या संकटापासून जनतेचे लक्ष विचलित करायचे, असे राजकारण महाविकास आघाडीकडून चालू आहे. सामान्य जनता चहुबाजूंनी संकटात असताना महाविकास आघाडीकडून आरोपांचे राजकारण चालू आहे. पण, राज्य सरकारने आता तरी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी शक्ती एकवटली नाही तर सामान्य लोकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

नवाब मलिकांचे आरोप बालिश आणि हास्यास्पद 

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी रेमडिसिवर औषधाबाबत काल केलेला आरोप बालिश आणि हास्यास्पद आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिव्हीर विकण्यास सोळा कंपन्यांना मनाई केली, असा धादांत असत्य आरोप त्यांनी केला. त्यासाठीचे पुरावे मागितले तर त्यांनी ते दिलेले नाहीत. केंद्रावर आरोप केला असताना त्यांनी गुजरात सरकारचा आदेश दाखविला. एखाद्या कंपनीने रेमडेसिव्हीर विकण्यासाठी गुजरात सरकारला परवानगी मागितली तर ते सरकार केवळ त्यांच्या राज्यापुरताच आदेश देऊ शकते, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

आरोप करा आणि पळून जा

महाराष्ट्र सरकारनेही असाच आदेश दिला आहे. असे असताना नवाब मलिक यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आरोपाची केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दखल घेतली आणि माहिती देण्याची विनंती केली. नवाब मलिक यांनी माहिती दिलेली नाही. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वारंवार ‘आरोप करा आणि पळून जा’, असा प्रकार चालू आहे. पण आता आम्ही हे प्रकरण धसास लावल्याशिवाय राहणार नाही. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवरील आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावा किंवा माफी मागावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.  (Chandrakant Patil comment on Nawab Malik Statement)

संबंधित बातम्या : 

रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याचे फडणवीसांनी वकीलपत्रं घेतलं काय?; नवाब मलिक यांचा सवाल

पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर; नितेश राणेंचा शिवसेना आमदारावर पलटवार