भाजपची वेगवान पावलं, अजित पवार, अनिल परब यांची CBI चौकशी करा, थेट अमित शाहांना पत्र

| Updated on: Jun 30, 2021 | 2:32 PM

भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची CBI चौकशी करावी, अशी मागणी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

भाजपची वेगवान पावलं, अजित पवार, अनिल परब यांची CBI चौकशी करा, थेट अमित शाहांना पत्र
Ajit Pawar_Anil Parab
Follow us on

मुंबई : भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची CBI चौकशी करावी, अशी मागणी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. भाजपने नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये याबाबतचा ठराव संमत केला होता. त्याप्रमाणे आता भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसं निवेदन पाठवले आहे. (BJP Chandrakant Patil writes HM Amit Shah, demands CBI probe of Ajit Pawar and Anil Parab in Param Bir singh Sachin Vaze case )

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्यांची सीबीआयतर्फे सखोल चौकशी करा, असं चंद्रकांत पाटील यांनी निवेदनात म्हटलं आहे. प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण ही मागणी करत असल्याचा चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवल्यानंतर अमित शाह कोणता निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजपचा ठराव 

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत 25 जून रोजी मांडण्यात आला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Param Bir Singh) यांच्या लेटर बॉम्ब संदर्भात अजित पवार आणि शिवसेना नेते- परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची चौकशी करण्याची मागणी केली  आहे.

काय आहे ठराव?

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे सातत्याने उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालू आहे, असं ठरावात म्हटलं आहे.

गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी कार्यकारिणीने केली आहे.

काय आहे प्रकरण?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहिना 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

संबंधित बातम्या  

काल अजित पवारांविरोधात CBI चौकशीचा ठराव, आज अनिल देशमुखांवर ED चे छापे 

परमबीर सिंग लेटरबॉम्ब, अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा, भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव