42 वर्ष पक्षाची सेवा करणं गुन्हा असेल तर तो मी केलाय, खडसे उद्विग्न

पहिल्या यादीत विनोद तावडे, एकनाथ खडसे (BJP List Eknath Khadse), प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित या दिग्गजांचं नाव नाही. खडसेंनी यानंतर उद्विग्न प्रतिक्रियी दिली आहे.

42 वर्ष पक्षाची सेवा करणं गुन्हा असेल तर तो मी केलाय, खडसे उद्विग्न
| Edited By: | Updated on: Oct 01, 2019 | 5:12 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली 125 उमेदवारांची यादी (BJP List Eknath Khadse) जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम, चंद्रकांत पाटील कोथरुड, अतुल भोसले- कराड दक्षिण, शिवेंद्रराजे भोसले जावळी यांना उमेदवारी मिळाली आहे. पहिल्या यादीत विनोद तावडे, एकनाथ खडसे (BJP List Eknath Khadse), प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित या दिग्गजांचं नाव नाही. खडसेंनी यानंतर उद्विग्न प्रतिक्रियी दिली आहे.

“पहिल्या यादीत नाव आलेलं नाही. पण दुसरी यादीही जाहीर होणार आहे, त्यात नाव येईल अशी अपेक्षा आहे. नाव नाही आलं तरीही पक्षाचं काम करत राहिन. पण पक्षाला एक प्रश्न नक्की विचारणार की नाथाभाऊंचा गुन्हा काय? 42 वर्ष पक्षाची सेवा करणं हा गुन्हा असेल, तर तो गुन्हा मी केलाय,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

खडसेंनी पक्षाच्या एबी फॉर्मशिवायच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते अधिकृतपणे पक्षाचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल करतील. भाजपने अनेक दिग्गजांना वेटिंगवर ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार करणारे खडसेच यादीत नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्येही प्रचंड रोष आहे.

VIDEO : एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया