AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ गोष्टींमुळे प्रतापराव जाधवांच्या बोलण्याला बळ मिळतय, उद्धव ठाकरेंवर करण्यात आलेल्या शंभर कोटींच्या आरोपांवर शेलारांची प्रतिक्रिया

भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सचिन वाझे हे शिवसेनेचेच कार्यकर्ते होते असं शेलार यांनी म्हटलं आहे.

'या' गोष्टींमुळे प्रतापराव जाधवांच्या बोलण्याला बळ मिळतय, उद्धव ठाकरेंवर करण्यात आलेल्या शंभर कोटींच्या आरोपांवर शेलारांची प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2022 | 3:11 PM
Share

मुंबई: भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (Shiv sena) जोरदार हल्लाबोल केला आहे. सचिन वाझे हे शिवसेनेचेच कार्यकर्ते होते असं शेलार यांनी म्हटलं आहे. वाझे यांना पुन्हा पोलीस दलात कसे घेण्यात आले? त्यासाठी दबाव कोणी टाकला? कोणी विशेष प्रयत्न केले हे सर्व कोर्टाच्या रेकॉर्डवर आहे. तसेच सचीन वाझे हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते हे देखील स्पष्ट आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाच हात दिसतो. त्यामुळे प्रतापराव जाधव यांच्या बोलण्याला बळ मिळतंय असं शेलार यांनी म्हटलं आहे. आता शेलार यांच्या टीकेला शिवसेना काय प्रत्युत्तर देणार हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रतापराव जाधवांचा आरोप काय?

प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप केले आहेत. मातोश्रीवर दर महिन्याला शंभर कोटी जायचे. सचिन वाझे हे पैसे देण्याचे काम करायचे असं प्रतापराव जाधव यांनी म्हटलं आहे. प्रतापराव जाधव यांच्या आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलचं तापलं असून, पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. या वादात आता भाजप नेते आशिष शेलार यांनी उडी घेतली असून, उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाधवांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या  पेडणेकर?

पेडणेकर यांनी  प्रतापराव जाधवांना खोचक टोला लगावला आहे. सध्या खालच्या स्थरावर आरोप केले जात आहे. मात्र यात किती तथ्य असते हे तपासावे लागेल. आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून त्यांना उत्तर देऊ असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊत...
FDA मधील ‘लुटी’च्या आरोपांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण; संजय राऊतांना दिलं उत्तर
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं...
मतचोरीवर बोलणारा मी एकमेव सत्ताधारी; शिंदे गटातील नेता अचानक असं का म्हणाला?
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील...
भाऊ भाऊ म्हणत समर्थक भिडले; विक्रोळीत मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संध
महाराष्ट्रात विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ, युवकांसाठी मोठ्या रोजगार संधी; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन...
राज ठाकरे यांचा मुंबईत ईव्हीएमविरोधात विशाल मोर्चा, तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक...
मुंबईच्या आझाद मैदानावर उपवर्गीकरण आंदोलन; मातंग समाजातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय...
राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद? संजय राऊतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट...
Pune : बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत अचानक आग; चौथ्या मजल्यावर धुराचे लोट, अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
Water Level In Dams : पुढील 9 महिने पाण्याची चिंता वाढणार? राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....