शिवसेनेचे मोठे नेते तुमच्या प्रचारात आहेत का? आशिष शेलार म्हणतात…..

| Updated on: Oct 17, 2019 | 3:18 PM

शिवसेनेचे मोठे नेते तुमच्या (Ashish Shelar campaign) प्रचारात सक्रिय दिसतात का, असा  प्रश्न आशिष शेलार यांना विचारण्यात आला.

शिवसेनेचे मोठे नेते तुमच्या प्रचारात आहेत का? आशिष शेलार म्हणतात.....
Follow us on

Maharashtra Assembly election 2019 मुंबई : निवडणुकीच्या धामधुमीत राज्याचे शिक्षण मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar campaign) यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना विविध विषयावर भाष्य केलं. शिवसेनेचे मोठे नेते तुमच्या (Ashish Shelar campaign) प्रचारात सक्रिय दिसतात का, असा  प्रश्न आशिष शेलार यांना विचारण्यात आला.

त्याबाबत शेलार म्हणाले, “शिवसेनेचे नेते स्वतः अनिल परब माझ्या प्रचारासाठी आले. त्यानंतर सर्व शिवसैनिक पूर्णपणे कामाला लागले आहेत. त्यामुळे यात कुठलीही अशी साधी फटही नाही की काही नवीन विषय पुढे राहील” 

राज ठाकरेंच्या टीकेवर प्रतिक्रिया

निवडणुकीच्या राजकारणामध्ये प्रचाराला महत्त्व आहे. त्या प्रचारामध्ये  टीकाटिप्पणीचे आम्ही स्वागतच करत असतो. काही पक्ष, काही पक्षांच्या नेत्यांचं प्रचारापेक्षा अपप्रचारावर भाषण असतं. क्रियावादी की प्रतिक्रियावादी यानुसार काही पक्षाचे नेते आयुष्यभर प्रतिक्रियावादी दिसतात. त्यामुळे अशा पद्धतीचा प्रचार महाराष्ट्र मान्य करत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये व्यक्तीला पातळी सोडून बोललेलं महाराष्ट्राने कधीच त्याचे स्वागत केले नाही, असं आशिष शेलार म्हणाले.

राज्याच्या निवडणुकीत केंद्राची मुद्दे का?

याबाबत आशिष शेलार म्हणाले, पाच वर्षात आम्ही केलेल्या कामाची माहिती मुख्यमंत्री असतील, प्रदेशाध्यक्ष असतील, अमितभाई असतील, मोदीजी असतील हे सगळे या विषयावरही चर्चा करतात. जे विषय विरोधकांना अडचणीचे वाटतात, त्यांच्यावर आम्ही बोलू नये अशी त्यांची अपेक्षा आहे तर ती चूक आहे. केंद्राचे मुद्दे राज्याचे मुद्दे असे वेगळे करायचे झाले, तर ज्या मुद्यावर केंद्राच्या निवडणुका झाल्या त्या मुद्द्यावर वारंवार विरोधक बोलतात. नोटबंदीच्या मुद्यावर केंद्राची निवडणूक झाली पण विरोधक आताही त्या मुद्द्यावर निवडणूक लढवतात पण आम्ही त्याला विरोध करणार नाही”

कलम 370 बाबतची भूमिका विचारणार

कलम 370 वर आपण घेतलेली भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य नाही, त्यामुळे वारंवार 370वर बोलू नये, असे विरोधकांना वाटत असते. मात्र ते आम्हाला मान्य नाही. आम्ही त्यांची भूमिका वारंवार विचारणार. एक राष्ट्र एक पक्ष एक ध्वज अशी आमची भूमिका आहे. कश्मीरसाठी महाराष्ट्रातील भूमिपुत्रांनी रक्त सांडले आहे. तो प्रश्न आम्ही विचारणार, तुमची अडचण होते म्हणून आम्ही तो प्रश्न विचारायचं टाळणार नाही.