Video: संभाजी छत्रपतींची सरकारला सहकार्य करण्याची कृती मान्य नाही; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

| Updated on: May 30, 2021 | 1:25 PM

मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कोणता मार्ग हाताळायचा यावरून भाजपचे खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. (BJP leader Chandrakant Patil take a dig at sambhaji chhatrapati)

Video: संभाजी छत्रपतींची सरकारला सहकार्य करण्याची कृती मान्य नाही; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
चंद्रकांत पाटील आणि संभाजीराजे छत्रपती
Follow us on

मुंबई: मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कोणता मार्ग हाताळायचा यावरून भाजपचे खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. संघर्ष न करता सरकारला सहकार्य करण्याची संभाजी छत्रपती यांची भूमिका आम्हाला अमान्य आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाटील यांच्या या भूमिकेमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असून या मुद्दयावरून भाजपमध्ये संभाजी छत्रपती एकाकी पडल्याचं चित्रंही निर्माण झालं आहे. (BJP leader Chandrakant Patil take a dig at sambhaji chhatrapati)

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना मराठा आरक्षणाबाबतची भाजपची भूमिका नेमक्या शब्दात स्पष्ट केली. मराठा आरक्षण लगेच मिळावं, मराठा समाजाला सवलती मिळाव्यात यासाठी जो जो व्यक्ती संघर्ष करेल. त्याच्याबरोबर आम्ही आहोत. हे आम्ही दहावेळा सांगितलं आहे. संभाजीराजे हे आमचे राजे आहेत. राजेंनी आरक्षण मिळालं पाहिजे, पण संघर्ष न करता मिळालं पाहिजे, असं स्पष्ट केलं आहे. आरक्षणासाठी संघर्ष करायचा की नाही हे कोविड संपल्यावर बघू असं त्यांनी सांगितलं आहे. हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. पण त्यांची कृती सरकारला सहकार्य करण्याची असेल आणि कोविडमुळे शांत बसण्याची त्यांची भूमिका असेल तर आम्हाला ती मान्य नाही. त्यांची कृती सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घेण्याची असेल तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत आहोत, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

कोविड आणि आरक्षणाचा काय संबंध?

कोविडचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही. जनजीवन व्यवस्थित सुरू आहे. भ्रष्टाचार सुरू आहे. दोन हाताने खाणं सुरू आहे. तरीही मराठा समाजाने रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत थांबायचे का? हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजेंच्या इतर गोष्टी मान्य आहेत. पण ही भूमिका अजिबात मान्य नाही, असं ते म्हणाले.

तर पवारांच्यामागेही उभा राहील

परवा मी पाच मागण्या केल्या होत्या. त्याच मागण्या संभाजीराजेंनी मांडल्या आहेत. जो कोणीही मराठा आरक्षणासाठी आंदोलन करेल तो याच मागण्या पुढे रेटेल, असं सांगतानाच संघर्ष करून मराठा समाजाला न्याय मिळून देण्याची भूमिका शरद पवार किंवा अजित पवारांची असेल तर त्यांच्यामागे पहिला शिपाई म्हणून मी उभा असेल असं मी आधीच सांगितलं आहे, असंही ते म्हणाले.

4 तारखेला याचिका दाखल करा

येत्या 4 जून रोजी मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 4 तारखेला पुनर्विचार याचिका दाखल केली नाही तर कोर्टाकडे तारीख मागावी लागेल. त्यावेळी कोर्ट तारीख देईल की नाही माहीत नाही. तसेच पुनर्विचार याचिका उशिरा दाखल केल्याबद्दल कोर्ट सरकारला जाबही विचारेल. त्यामुळे येत्या 4 तारखेला याचिका दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली.

नो कमेंट्स

संभाजी छत्रपती यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचे आणि खासदारकीचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? असा सवाल पाटील यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर बोलण्याची गरज नाही, असं पाटील म्हणाले. (BJP leader Chandrakant Patil take a dig at sambhaji chhatrapati)

संबंधित बातम्या:

अजितदादा सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर महागात पडेल: चंद्रकांत पाटील

चंद्रकांतदादांना स्वप्ने बघण्याचा छंद, त्यावर काय बोलणार?; जयंत पाटलांची खोचक टीका

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट, अर्धा तास खलबतं; चर्चा मात्र गुलदस्त्यात

(BJP leader Chandrakant Patil take a dig at sambhaji chhatrapati)