विधानसभेसाठी महायुतीत कोण किती जागा लढणार? चंद्रकांत पाटलांनी संपूर्ण फॉर्म्युलाच सांगितला!

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने घवघवीत यश मिळवल्यानंतर, आता विधानसभेची तयारीही सुरु झाली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होतील. या पार्श्वभूमीवर युती, आघाडी, जागावाटप इत्यादी गोष्टींची चर्चाही सुरु झाली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवणाऱ्या शिवसेना-भाजप महायुतीच्या जागावाटपावर चर्चाही सुरु केली असून, राज्य भाजपमधील वरिष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री […]

विधानसभेसाठी महायुतीत कोण किती जागा लढणार? चंद्रकांत पाटलांनी संपूर्ण फॉर्म्युलाच सांगितला!
| Edited By: | Updated on: Jun 02, 2019 | 3:29 PM

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने घवघवीत यश मिळवल्यानंतर, आता विधानसभेची तयारीही सुरु झाली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होतील. या पार्श्वभूमीवर युती, आघाडी, जागावाटप इत्यादी गोष्टींची चर्चाही सुरु झाली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवणाऱ्या शिवसेना-भाजप महायुतीच्या जागावाटपावर चर्चाही सुरु केली असून, राज्य भाजपमधील वरिष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना विधानसभेचा फॉर्म्युलाही सांगितला आहे.

राज्यात 288 पैकी 18 जागा आम्ही घटकपक्षाला सोडणार आहोत आणि उरलेल्या 170 जागांपैकी 135-135 जागा शिवसेना आणि भाजप लढवणार आहोत, अशी माहिती महसूलमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नते चंद्रकांत पाटील यांनी दिली. दुष्काळ दौऱ्यानिमित्त चंद्रकांत पाटील आज औरंगबादेत होते. त्यावेळी ते बोलत होते.

महायुतीत शिवसेना आणि भाजप हे मुख्य पक्ष आहेत. तर महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष आणि सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना हे घटकपक्ष आहेत.

2014 साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुका सर्वच प्रमुख पक्षांनी स्वबळावर लढल्या होत्या. 2014 ची लोकसभा युती करुन लढणाऱ्या भाजप-शिवसेनेने विधानसभा निवडणुका मात्र स्वबळावर लढल्या. त्यावेळी भाजपला 122 जागा आणि शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या.