Maharashtra politics : कर्माची फळे भोगणाऱ्या सर्वज्ञानी संपादकांनी वड्याचं तेल वांग्यावर काढू नये; चित्रा वाघ यांचा पुन्हा संजय राऊतांवर निशाणा

चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वड्याचं तेल वांग्यावर काढण्याच्या झमेल्यात सर्वज्ञानी संपादकांनी पडू नये, कर्माची फळे भोगताना "सुख मानण्यावर आहे" या मुख्यमंत्र्यांच्या उपदेशाचे स्मरण करावे आणि आनंदात रहावे असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

Maharashtra politics : कर्माची फळे भोगणाऱ्या सर्वज्ञानी संपादकांनी वड्याचं तेल वांग्यावर काढू नये; चित्रा वाघ यांचा पुन्हा संजय राऊतांवर निशाणा
चित्रा वाघ
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 26, 2022 | 7:53 AM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics)  राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेसमोरील (shivsena) अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेतील एका मोठा आमदारांच्या गटाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनले आहे. या सर्वांमागे भाजपाचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, फडणवीसांनी या झमेल्यात पडू नये, देवेंद्र फडणवीस जरी आमचे राजकीय विरोधक असले तरी त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. आता यावरून संजय राऊत यांच्यावर भाजप नेत्या चित्र वाघ यांनी निशाणा साधला आहे. वड्याचं तेल वांग्यावर काढण्याच्या झमेल्यात सर्वज्ञानी संपादकांनी पडू नये, कर्माची फळे भोगताना “सुख मानण्यावर आहे” या मुख्यमंत्र्यांच्या उपदेशाचे स्मरण करावे आणि आनंदात रहावे असे वाघ यांनी म्हटले आहे.

 

नेमकं काय म्हटलय वाघ यांनी?

चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर बनवण्यामागे फडणवीसांचा हात आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता, फडणवीसांनी या झमेल्यात पडू नये, ते जरी आमचे विरोधक असले तरी त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच असल्याचे राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. वड्याचं तेल वांग्यावर काढण्याच्या झमेल्यात सर्वज्ञानी संपादकांनी पडू नये, कर्माची फळे भोगताना “सुख मानण्यावर आहे” या मुख्यमंत्र्यांच्या उपदेशाचे स्मरण करावे आणि आनंदात रहावे असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

सामनामधून पुन्हा शिंदेंवर निशाणा

दुसरीकडे आज सामनामधून पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधण्यात आला आहे. जेव्हा या आमदारांना त्यांच्या म्होरक्याने महाराष्ट्रातून गुजरातला नेले, तेव्हा आपण भाजपासोबत सत्ता स्थापन करू असे सांगितले होते. मात्र तसे घडताना दिसत नाहीये. सोबतच राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याने त्यांना महाराष्ट्रात देखील येता येत नसल्याने त्यांचा गुवाहाटीमधील मुक्का वाढल्याची टीका सामना या शिवसेनेच्या मुखपत्रामधून करण्यात आली आहे.