BREAKING : आशिष शेलार-अमित शाहांची दिल्लीत भेट, आता फडणवीस-चंद्रकांत पाटील तातडीने दिल्लीला जाणार?

| Updated on: Aug 06, 2021 | 6:25 PM

राज्याच्या राजकारणात भेटीगाठींचा सिलसिला सुरुच आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटी घेत असताना आता आणखी एका गुप्त भेटीची माहिती समोर आली आहे.

BREAKING : आशिष शेलार-अमित शाहांची दिल्लीत भेट, आता फडणवीस-चंद्रकांत पाटील तातडीने दिल्लीला जाणार?
फाईल फोटो
Follow us on

नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात भेटीगाठींचा सिलसिला सुरुच आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटी घेत असताना आता आणखी एका गुप्त भेटीची माहिती समोर आली आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत गुप्त भेटल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आज तातडीने दिल्ली रवाना होण्याची शक्यता आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा उद्यापासून चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांचं दिल्लीत काय सुरु आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

नुकतंच तीन दिवसापूर्वी शरद पवारांनी अमित शाहांची भेट घेतली होती. आज चंद्रकांत पाटील-राज ठाकरे यांची भेट झाली. हे सर्व माध्यमांसमोर येत असताना आता आशिष शेलार-अमित शाहांची गुप्त बैठक झाल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस हे आता अमित शाहांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

देवेंद्र फडणवीस आजच दिल्लीला जाणार? 

देवेंद्र फडणवीस हे सध्या मुंबईत आहेत. मात्र त्यांचा दिल्लीचा कोणताही नियोजित दौरा नाही. पण सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता, देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आजच दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आधीच आशिष शेलार दिल्लीत आहेत, त्यात चंद्रकांत पाटलांचा नियोजित 4 दिवसांचा दिल्ली दौरा आहे. अशा परिस्थितीत भाजपचे तीन बडे नेते दिल्लीत भेटीगाठी घेत असल्याने महाराष्ट्राच्या नजरा दिल्लीकडे लागल्या आहेत.

चंद्रकांत पाटील यांचा दिल्ली दौरा

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा नियोजित दिल्ली दौरा आहे. चंद्रकांत पाटील हे चार दिवस दिल्लीत असतील. पक्ष-संघटनेच्या कामानिमित्त ते दिल्लीत असतील. चंद्रकांत पाटील हे भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रात पक्षवाढीबरोबरच आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मनसेसोबतच्या युतीबाबत चर्चा होऊ शकते.

चंद्रकांत पाटील- राज ठाकरे भेट

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली. पाटील स्वत: राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी गेले. तिथंच दोघांची मिटींग झाली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरेंची भेट घेतली, आमची राजकीय चर्चा झाली, पण भाजप-मनसे युतीबाबत कोणताही प्रस्ताव नाही.

शरद पवार-अमित शाह भेट 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी 3 ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे नवे सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. राजधानी दिल्लीत दोघांची भेट झाली. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेही बैठकीला उपस्थित होते.

शरद पवार नरेंद्र मोदी भेट 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 17 जुलैला पंतप्रधान कार्यालयात भेट झाली होती. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली होती. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती.

संबंधित बातम्या 

फडणवीस म्हणतात, राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा नाही, मग चंद्रकांत पाटील कृष्णकुंजवर का?

राज ठाकरेंसोबत युती करायला भाजपा बिचकतेय का? उत्तर भारतीय मतांचा फटका बसणार? वाचा सविस्तर

आधी तटकरेंच्या उपस्थितीत शरद पवार-अमित शाहांची बैठक, मग तटकरेंशिवाय वेगळी चर्चा!