स्वप्नीलच्या आईचा व्हिडीओ स्क्रीनवर लावा, त्याच्या कुटुंबीयांना सरकारनं 50 लाख द्यावेत, सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक

| Updated on: Jul 05, 2021 | 12:04 PM

सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत स्वप्नील लोणकर याच्या आईचा व्हिडीओ स्क्रीनवर दाखवा. स्वप्नीलच्या आईचा आक्रोश प्रशासनातील निगरगट्ट अधिकाऱ्यांना आणि महाविकास आघाडी सरकारला पाहूद्या, अशी मागणी केली.

स्वप्नीलच्या आईचा व्हिडीओ स्क्रीनवर लावा, त्याच्या कुटुंबीयांना सरकारनं 50 लाख द्यावेत, सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक
सुधीर मुनगंटीवार
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत स्वप्नील लोणकर याच्या आईचा व्हिडीओ स्क्रीनवर दाखवा. स्वप्नीलच्या आईचा आक्रोश प्रशासनातील निगरगट्ट अधिकाऱ्यांना आणि महाविकास आघाडी सरकारला पाहूद्या, अशी मागणी केली. सुधीर मुनंगटीवार यांनी विधानसभेत बोलताना टीव्ही 9 मराठीनं दाखवेल्या वृत्ताची दखल घेतली. स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत जाहीर करा, अशीही मागणी त्यांनी केली. (BJP leader Sudhir Mungantiwar said Swapnil Lonkar mother video should be telecast in Assembly and Govt should gave 50 lakhs to family)

430 विद्यार्थ्यांचा आत्महदहनाचा इशारा

स्वप्नील लोणकर याच्या आत्महत्येनंतर 430 विद्यार्थी आम्हीपण आत्मदहन करु असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फोन करुन सभागृहात हा विषय मांडण्याची मागणी केली आहे. नोकरीच्या वयोमर्यादेत दोन वर्ष वाढ द्या, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण हलका होऊ शकतो, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये सरकारनं द्यावेत, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली. सरकार बारा आमदार बारा आमदार बाबा पकोडा, असं म्हणत मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकार निशाणा साधला. राज्य सरकारला माहिती आयुक्त आणि एमपीएससीचे सदस्य नियुक्त करता आले नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

सगळं कामकाज बाजूला ठेवा, एमपीएसीच्या मुद्यावर चर्चा घ्या

स्वप्नील लोणकार पास झाला पण मुलाखत झाली नाही. दुसरी पूर्व परीक्षा झाली पण मुख्य परीक्षा झाली नाही. स्वप्नील लोणकरची आत्महत्येनंतर अतिशय मन हेलावून टाकणारी परिस्थिती आहे. दोन दोन वर्षं मुलाखत होत नाहीत, परीक्षा होत नाहीत. अजून किती स्वप्नील लोणकर आपल्याला लागतील? राज्य सरकार या संदर्भात दखल घेणार आहे की नाही. एमपीएसीची कार्यपद्धत बदलणार आहे की नाही. एखादा स्वप्नील आत्महत्या करतो काय जगतो काय मरतो काय याचं एमपीएससीला देण घेणं नाही. आमच्या तरुणाईसाठी एमपीएसीच्या कारभारावर चर्चा झाली पाहिजे. एमपीएसची कार्यप्रणाली बदलली पाहिजे, त्यांच्या कारभारावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

स्वप्नीलने सुसाईड नोटमध्ये काय म्हटलंय?

पासआऊट होऊन दोन वर्ष झाली आहेत. 24 वय संपत आलं आहे. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेले कर्ज, खासगी नोकरी करुन कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना. नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस मनात होती. पण काही तरी चांगलं होईल या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे काहीच उरलेलं नाही. यास कोणत्याही व्यक्ती कारणीभूत नसून हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मला माफ करा, 100 जीव वाचवायचे होते, मला डोनेशन करुन मात्र आता 72 राहिले

स्वप्नीलने टोकाचं पाऊल का उचललं?

एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

संबंधित बातम्या:

Monsoon Session Live Updates | सरकारने लोकशाहीला कुलूप लावलं, प्रश्नोत्तरे, तारांकित प्रश्न नसल्याने विरोधी पक्षनेते फडणवीस आक्रमक

सरकारला आदित्य, रोहित, पार्थच्या भविष्याची चिंता, गोरगरिब पोरांची नाही, आ. राम सातपुतेंचा हल्लाबोल

(BJP leader Sudhir Mungantiwar said Swapnil Lonkar mother video should be telecast in Assembly and Govt should gave 50 lakhs to family)