शिवसेना विश्वासघातकी पक्ष, भाजपच्या माजी आमदाराची टीका

| Updated on: Nov 05, 2019 | 8:03 PM

"शिवसेना हा मोठा विश्वासघातकी पक्ष आहे. त्यामुळे येत्या काळात मी आणि आमदार गीता जैन मिळून मीरा भाईंदरमधील शिवसेना मुळासकट संपवून टाकणार," अशी टीका भाजपचे पराभूत आमदार नरेंद्र मेहता यांनी (Bjp MLA criticize shivsena) केली आहे.

शिवसेना विश्वासघातकी पक्ष, भाजपच्या माजी आमदाराची टीका
Follow us on

मीरा भाईंदर : “शिवसेना हा मोठा विश्वासघातकी पक्ष आहे. त्यामुळे येत्या काळात मी आणि आमदार गीता जैन मिळून मीरा भाईंदरमधील शिवसेना मुळासकट संपवून टाकणार,” अशी टीका भाजपचे पराभूत आमदार नरेंद्र मेहता यांनी (Bjp MLA criticize shivsena) केली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांनी हे वक्तव्य (Bjp MLA criticize shivsena) केले.

विधानसभा निवडणुकीत महायुतीतर्फे भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी मिळाली होती. त्यानंतर भाजप माजी महापौर आणि नगसेविका गीता जैन यांनी बंडखोर करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मीरा भाईंदर विधानसभेत त्रिशंकू लढत झाली. या निवडणुकीत शिवसेनेने नरेंद्र मेहतांना मदत केली नाही. यामुळे नरेंद्र मेहता पराभूत झाले आणि अपक्ष गीता जैन या विजयी झाले होते.

यानंतर नाराज मेहता यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर टीका केला. “शिवसेना हा मोठा विश्वासघातकी पक्ष आहे. त्यामुळे येत्या काळात मी आणि आमदार गीता जैन मिळून मीरा भाईंदरमधून शिवसेना मुळासकट संपवून टाकू,” असे ते म्हणाले.

“नरेंद्र मेहता यांनी केलेल्या या वक्तव्यावर बोलणे मला योग्य वाटत नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते प्रवीण पाटील यांनी दिली. ज्या उमेदवाराला मिरा भाईंदरच्या जनतेने नाकारलं आहे. त्याला उत्तर देणे योग्य ठरत नाही. मात्र जर त्यांनी शिवसेनेबद्दल काही बोलले असतील, तर त्याला शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर देऊ,” असेही ते (Bjp MLA criticize shivsena) म्हणाले.

“आम्हाला विश्वासघातकी बोलण्यापेक्षा त्यांनी स्वत:कडे बघितले पाहिजे. मीरा भाईंदरमध्ये भाजपचे 61 नगरसेवक आहेत. तसेच कार्यकर्त्यांचेही प्रमाण मोठं आहे. पण तरीही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे याचे आत्मचिंतन नरेंद्र मेहता यांनी करावे. नंतर दुसऱ्याला बोलावे,” असा टोलाही प्रवीण पाटील यांनी नरेंद्र मेहता यांना लगावला.

“शिवसेना भाजपची मैत्री 25 वर्षांपासून आहे. भाजप शिवसेना युतीमध्ये निवडणूक लढली होती. जर निवडणुकीत विजयीसाठी शिवसेनेनं मला मदत केली असेल तर मेहता यांनी त्याचा पुरावा दाखवावा,” असे मत भाजप समर्थक अपक्ष आमदार गीता जैन यांनी व्यक्त केले.

शिवसेना-भाजपमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन फूट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 13 दिवस उलटले. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापना खोळंबली आहे. त्यातच आघाडीही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये भाजप शिवसेनेत फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेना भाजपचा हा लढा असाच कायम राहणार की संपणार याच्याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.