शिवरायांच्या जयघोषावर हात वर करुन दाखवा, गिरकरांच्या मागणीला नवाब मलिकांचं उत्तर

नवाब मलिक यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या घोषणेवर हात वर करुन दाखवावा, अशी मागणी भाई गिरकरांनी करताच भाजप आमदारांनी शिवरायांचा जयघोष केला.

शिवरायांच्या जयघोषावर हात वर करुन दाखवा, गिरकरांच्या मागणीला नवाब मलिकांचं उत्तर
| Updated on: Feb 28, 2020 | 1:35 PM

मुंबई : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणेवर अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी हात वर केला नव्हता, असा आक्षेप भाजप आमदार भाई गिरकर यांनी विधीमंडळात घेतला. त्यानंतर नवाब मलिक यांनी टोला लगावत गिरकरांनाच गप्प केलं. (Bhai Girkar Nawab Malik tussle)

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पाचवा दिवस सुरु आहे. प्रश्नोत्तराच्या तासाला विविध विषयांवर सत्ताधारी आणि विरोधीपक्षात खडाजंगी सुरु होती. मात्र मध्येच भाजपचे विधानपरिषदेतील आमदार भाई उर्फ विजय गिरकर उभे राहिले आणि त्यांनी नवाब मलिक यांना प्रश्न विचारला.

हेही वाचाओबीसी जनगणनेबाबात एकमत, महाराष्ट्र विधानसभेत कोण काय म्हणाले?

‘नवाब मलिक सभागृहात आहेत. मागे त्यांची एक क्लिप वायरल झाली होती. त्यामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज की… जय’ या घोषणेवर नवाब मलिक यांनी हात वर केला नसल्याचं दिसत होतं. तेव्हा मलिक यांनी या घोषणेवर हात वर करुन दाखवावा, अशी मागणी गिरकरांनी करताच भाजप आमदारांनी शिवरायांचा जयघोष केला.

भाई गिरकर यांच्या आक्रमक मागणीवर नवाब मलिक यांनी तितकंच शांतपणे उत्तर दिलं. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ ही घोषणा हात वर करुन देता येत नाही, हा तुमचा गैरसमज आहे. ती तोंडाने देता येते, तुम्ही हाताने देऊन दाखवा’ असा टोला लगावत नवाब मलिक खाली बसले. मलिक यांच्या पवित्र्याने गिरकरच निरुत्तर झाले. (Bhai Girkar Nawab Malik tussle)