Anil Bonde | ग्राम पंचायतीत जनतेने शिंदे गटाला स्वीकारलंय, आता कागदोपत्री मॅटर उरलाय, भाजप खासदार अनिल बोंडेंचं वक्तव्य!

| Updated on: Aug 08, 2022 | 11:07 AM

लोकांनी स्वीकारलंय की दुसरा पक्ष जो आहे, तो शिवसेना आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देईल, तो कार्यालयीन मॅटर आहे. लोकांच्या मनातलं लोकांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून चंगाल्या प्रकारे दाखवून दिलंय, असं अनिल बोंडे म्हणाले.

Anil Bonde | ग्राम पंचायतीत जनतेने शिंदे गटाला स्वीकारलंय, आता कागदोपत्री मॅटर उरलाय, भाजप खासदार अनिल बोंडेंचं वक्तव्य!
अनिल बोंडे, भाजप खासदार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूरः ग्रामंपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Election) जनतेने भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेला कौल दिलाय. लोकांनी बहुमतानं या पॅनलच्या सदस्यांना निवडून दिलंय. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, तो कागदोपत्री असेल, असं वक्तव्य भाजपचे खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलंय. शिवसेनेचे शिंदे गटातील लोक भाजपासोबत मैत्री करत आहेत, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटानेही भाजपसोबत युती केल्यास तिला अधिक बळकटी मिळेल, असंही अनिल बोंडे म्हणाले. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला आज निवडणूक आयोगासमोर पुरावे सादर करण्याची शेवटची मुदत आहे. दोन्ही गटाकडून आज दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक आयोगासमोर पुरावे सादर केले जाण्याची शक्यता आहे.

‘शिंदे -ठाकरे गटानं एकत्र यावं’

आज दोघांकडूनन पुरावे सादर केले जात आहेत. इलेक्शन कमिशनचे अधिकारी काय तो निर्णय घेतील. महाराष्ट्रातल्या जनतेनी निर्णय करून टाकलाय. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत एक नंबरवर भाजप राहिली आणि दोन नंबरवर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिंदे शिवसेना राहिली. लोकांनी स्वीकारलंय की हा भाजप आणि दुसरा पक्ष जो आहे, तो शिवसेना आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देईल, तो कार्यालयीन मॅटर आहे. लोकांच्या मनातलं लोकांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून चंगाल्या प्रकारे दाखवून दिलंय.

‘भाजपसोबत असल्यानेच मजबुती’

शिवसेनेतील 12 खासदार एकनाथ शिंदे गटात आले आहेत. अजूनही काही खासदार शिंदेगटाकडे येणार अशी चर्चा आहे. यावरील प्रश्नाला उत्तर देताना अनिल बोंडे म्हणाले, आणखी किती खासदार येणार, याची सविस्तर माहिती खासदार श्रीकांत शिंदे देऊ शकतील, मात्र एक आहे की, भारतीय जनता पक्षासोबत आल्यानेच मजबुती मिळेल, याची त्यांना खात्री पटली आहे.

‘विदर्भासाठी मदत मागणार’

यंदा अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना फटका बसलाय. विदर्भातील अनेक जिल्ह्यांतही मागील महिन्यात आलेल्या पावसामुळे मोठं नुकसात झालंय. येथील बाधितांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचं अनिल बोंडे यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘ विदर्भात गडचिरोली, अमरावती, वर्धेत मोठं नुकसान झालंय. कोकण आणि विदर्भापर्यंत खूप नुकसान झालंय. काल मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. त्यांनी तत्काळ एनडीआरएफची टीमही पाठवली. मात्र यावेळी एनडीआरएफची मदतच मिळून उपयोग नाही  तर पायाभूत सुविधांचं नुकसान झालंय. पूल वाहून गेलेत, जमीन खरडून गेलीय. यासाठी मदत मिळाली पाहिजे.’असं त्यांना सांगितल्याचं बोंडे म्हणाले.